रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमर्यादित दायित्वासाठी तृतीय पक्ष विम्याच्या मूळ हप्त्याशी संबंधित अधिसूचना जारी

प्रविष्टि तिथि: 26 MAY 2022 11:44AM by PIB Mumbai

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाशी सल्लामसलत करून  25.05.2022 ला जारी केलेल्या  अधिसूचनेच्या माध्यमातून  मोटार वाहने (तृतीय पक्ष विमा मूळ हप्ता आणि दायित्व) नियम, 2022 प्रकाशित केले आहेत. हे नियम 1 जून 2022 पासून लागू होतील.

 

या नियमांमध्ये, विविध वर्गांच्या वाहनांसाठी अमर्यादित दायित्वाच्या अनुषंगाने  तृतीय पक्ष विम्याचा मूळ हप्ता अधिसूचित करण्यात आला आहे.या नियमांनुसार विम्याच्या  हप्त्यामध्ये  खालील सवलतींनाही अनुमती आहे-

 

•      शैक्षणिक संस्थांच्या बसेससाठी 15%  सवलत  देण्यात आली आहे


•     विंटेज कार म्हणून नोंदणीकृत खाजगी मोटारीला  विम्याच्या हप्त्याच्या  50% सवलतीच्या दरात परवानगी देण्यात आली आहे.


•      हायब्रीड विद्युत वाहनांसाठी  विमा हप्त्यावर  7.5% सवलत  देण्यात आली आहे.

 

राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

JPS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1828432) आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil