पंतप्रधान कार्यालय
जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा, यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज दिनांक 24 मे 2022 रोजी टोकियो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये वॉशिंग्टन डी.सी.येथे पहिल्या क्वाड नेत्यांच्या प्रत्यक्ष झालेल्या शिखर बैठकीदरम्यान झालेल्या संवाद तसेच द्विपक्षीय बैठक, याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. भारत-जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ आणि मजबूत करण्यासाठी सुगा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर विचार विनिमय केला. यावेळी पंतप्रधानांनी सुगा यांना जपानी खासदारांच्या प्रतिनिधिमंडळासह भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1827927)
आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam