आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्य नोंदी व्यवस्थापन करण्यासाठी सुधारित आभा (ABHA) मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

Posted On: 24 MAY 2022 10:30AM by PIB Mumbai

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या त्यांच्या प्रमुख योजनेंतर्गत एका सुधारित आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) मोबाइल अनुप्रयोगाचा आरंभ करण्याची घोषणा केली आहे. आभा (ABHA) ॲप, जे याआधी एनएचडीएम (NDHM) आरोग्य नोंदी करण्याचे ॲप म्हणून ओळखले जात होते, ते ॲप गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि यापूर्वीच 4 लाखांहून अधिकवेळा ते डाउनलोड करण्यात आले आहे. आभा ॲपच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये नवीन वापरकर्ता इंटरफेस (UI) आणि अतिरिक्त कार्यक्षमता आहे ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कधीही आणि कुठेही त्यांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करते. विद्यमान आभा ॲप वापरकर्ते त्यांच्या मागील ॲपच्या आवृत्त्या नवीनतम आवृत्तीत  अद्ययावत करू शकतात.

 

आभा मोबाईल ऍप्लिकेशन एखाद्या व्यक्तीला आभावर आपले खाते (username@abdm) तयार करण्यास सक्षम करते, हे लक्षात ठेवण्यास सोपे असून वापरकर्त्याचे नाव सहजपणे त्यांच्याशी संलग्न असलेल्या 14 अंकी आभा क्रमांकाशी जोडले जाऊ शकते. मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरकर्त्यांना एबिडीएम (ABDM )अनुरूप आरोग्य सुविधेवर वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्य नोंदींशी संलग्न रहाण्यास आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये त्या पाहण्याची सुविधा देते.  अनुप्रयोग एबिडीएम (ABDM) नेटवर्कद्वारे तयार केलेल्या नोंदी एखाद्या व्यक्तीच्या संमतीनंतर रोगनिदान अहवाल, औषध विवरण पत्र, कोवीन (CoWIN) लसीकरण प्रमाणपत्र इत्यादी सारख्या डिजिटल आरोग्य नोंदी सामायिक करण्यासोबत एबिडीएमच्या  अनुरूप आरोग्य पेटीमध्ये शारीरिक आरोग्य नोंदी स्वत:हून -अपलोड करण्याची परवानगी देतो.

 

या सोबतच, आभा मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे आभा पत्त्यासह व्यक्तिगत माहिती संपादित करणे, लिंक करणे आणि आभा क्रमांकासोबत  (14 अंकी) अनलिंक करणे यासारखी नवीन परीचालन सुविधा आहेत. चेहऱ्यावरुन ओळख (फेस ऑथेंटिकेशन) / हाताच्या बोटांचे ठसे/ बायोमेट्रिक अशा पद्धतीने लॉगिन आणि एक्सप्रेस नोंदणीसाठी एबिडीएम अनुपालन सुविधेच्या काउंटरवर क्यूआर  (QR) कोड स्कॅन करण्याची क्षमता यासारखी इतर कार्ये देखील लवकरच याद्वारे जारी केली जाणार आहेत.

 

आभा मोबाइल ॲपची तपशीलवार माहिती देताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (NHA,नॅशनल हेल्थ अथॉरिटी) प्रमुख कार्यकारी संचालक डॉ. आर.एस.शर्मा, म्हणाले: “नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या सर्व नोंदी तयार करण्यास मदत करण्यासाठी आभा ॲप महत्त्वपूर्ण ठरेल. रुग्ण त्यांच्या आभापत्त्याच्या मदतीने काही सेकंदात त्यांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश करू शकतील, जे त्यांना अनेक मार्गांनी सक्षम करेल. हे त्यांना त्यांचा आरोग्य इतिहास (चाचण्यांचे अहवाल) एकाच ठिकाणी जतन करण्यास आणि त्यांच्या आरोग्याच्या नोंदी गहाळ होण्याची काळजी न करता कधीही आणि कुठेही प्रवेश करण्यास किंवा सामायिक करण्यास सक्षम करेल. माहिती देवाणघेवाण करून वैद्यकीय दृष्टीने रोगनिदान करून चांगले निर्णय घेणे आणि काळजी घेणे या बाबी हे डिजिटायझेशन सुनिश्चित करेल.

 

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) मोबाईल ॲप (पूर्वी NDHM हेल्थ रेकॉर्ड्स किंवा PHR ॲप म्हणून ओळखले जाणारे) गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून किंवा या लिंकवर क्लिक करून डाउनलोड केले जाऊ शकते: https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr

 

आभा मोबाईल ॲपची आयओएस (iOS) आवृत्तीची लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

 

एबिडीएमबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे: https://abdm.gov.in/

***

ST/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827877) Visitor Counter : 404