पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भूषविले टोकियोमध्ये व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान

Posted On: 23 MAY 2022 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2022

 

टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2022 रोजी जपानच्या व्यापार क्षेत्रातील धुरीणांबरोबर भरवलेल्या व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.

जपानच्या 34 कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. यापैकी बहुतांश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक  केली असून, त्यांचा कारभारही भारतात चालतो. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, अर्धवाहक, पोलाद, तंत्रज्ञान, व्यापार, बँकिंग आणि वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपन्या काम करतात. भारतातील आणि जपानमधील व्यापारविषयक महत्त्वाच्या संस्था- जसे- केडॅन्रन, जेट्रो म्हणजेच जपानी परकीय व्यापार संघटना, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य बँक, जपान-भारत व्यापार सल्ला समिती आणि इन्व्हेस्ट इंडिया- या संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या.

भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत, यावर भर देत पंतप्रधानांनी 'भारत-जपान संबंधांच्या सुप्त सामर्थ्याचे सदिच्छादूत' म्हणून, व्यापार-उदीम करणाऱ्या समुदायाचा गौरव केला. मार्च 2022 मध्ये जपानचे पंतप्रधान किशिदा भारतभेटीवर आले असताना, आगामी पाच वर्षांत 5 लाख कोटी येन इतकी गुंतवणूक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट उभय देशांनी ठरवले होते, असे पंतप्रधान म्हणाले.आर्थिक संबंधांमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडी पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. यांमध्ये,  IJICP अर्थात भारत जपान औद्योगिक स्पर्धात्मकता भागीदारी, स्वच्छ ऊर्जा भागीदारी, यांसह अन्य बाबींचा समावेश आहे. NIP अर्थात पायाभूत सेवांच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय नलिका, PLI अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना, आणि अर्धवाहकांविषयीचे धोरण यांबद्दल पंतप्रधान बोलले. भारतातील बळकट आणि व्यापक स्टार्टअप इकोसिस्टिम त्यांनी अधोरेखित केली.

जागतिक पातळीवर थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ मंदावला असूनही भारताने मात्र गेल्या वित्तीय वर्षात 84 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी विक्रमी थेट परकीय गुंतवणूक मिळवली आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेबद्दल जगाकडून मिळालेले हे विश्वासमतच म्हटले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी भारतात अधिक सहभागी होऊन 'जपान सप्ताहाच्या' रूपाने भारताच्या विकासयात्रेत योगदान द्यावे, असे निमंत्रणही त्यांनी दिले.

या कार्यक्रमात पुढील व्यापार-धुरीणांनी भाग घेतला-

Name Designation Organization

Mr. Seiji Kuraishi

Chairman and Director

Honda Motor Co., Ltd.

Mr. Makoto Uchida

Representative Executive Officer, President & CEO

Nissan Motor Corporation

Mr. Akio Toyoda

President and member of board of directors

Toyota Motor Corporation

Mr. Yoshihiro Hidaka

President, CEO & Representative Director

Yamaha Motor Corporation

Mr. Toshihiro Suzuki

President & Representative Director

Suzuki Motor Corporation

Mr. Seiji Imai

Chairman of Mizuho Financial Group

Mizuho Bank Ltd.

Mr. Hiroaki Fujisue

Advisor, MUFG Bank Ltd. and Chairman, JIBCC

MUFG Bank Ltd. and JIBCC

Mr. Takeshi Kunibe

Chairman of the Board of both Sumitomo Mitsui Financial Group (SMFG) and Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC)

Sumitomo Mitsui Banking Corporation

Mr. Koji Nagai

Chairman

Nomura Securities Co., Ltd.

Mr. Kazuo Nishitani

Secretary General

Japan-India Business Co-operation Committee

Mr. Masakazu Kubota

President

KEIDANREN

Mr. Kyohei Hosono

Director and COO

Dream Incubator Inc.

Mr. Keiichi Iwata

President of Sumitomo Chemical Co., Ltd Vice Chairman of Japan Petrochemical Industry Association

Sumitomo Chemical Co. Ltd.

Mr. Tsugio Mitsuoka

Chairman of the Board

IHI Corporation

Mr. Yoshinori Kanehana

Chairman of Board

Kawasaki Heavy Industries, Ltd.

Mr. Ryuko Hira

President & Representative Director

Hotel Management International Co. Ltd.

Mr. Hiroko Ogawa

CO&CEO

Brooks & Co. Ltd.

Mr. Vivek Mahajan

Senior Executive Vice President, CTO

Fujitsu Ltd.

Mr. Toshiya Matsuki

Senior Vice President

NEC Corporation

Mr. Kazushige Nobutani

President

JETRO

Mr. Yamada Junichi

Executive Senior Vice President

JICA

Mr. Tadashi Maeda

Governor

JBIC

Mr. Ajay Singh

Managing Executive Officer

Mitsui O.S.K. Lines

Mr. Toshiaki Higashihara

Director, Representative Executive Officer, Executive Chairman & CEO

Hitachi Ltd.

Mr. Yoshihiro Mineno

Senior Executive Officer, Member of the Board

Daikin Industries Ltd.

Mr. Yoshihisa Kitano

President & CEO

JFE Steel Corporation

Mr. Eiji Hashimoto

Representative Director and President

Nippon Steel Corporation

Mr. Akihiro Nikkaku

President and Representative Member of the Board

Toray Industries, Inc.

Mr. Motoaki Uno

Representative Director & Senior Executive Managing Officer

Mitsui & Co. Ltd.

Mr. Masayoshi Fujimoto

Representative Director, President & CEO

Sojitz Corporation

Mr. Toshikazu Nambu

Executive Vice President, Representative Director

Sumitomo Corporation

Mr. Ichiro Kashitani

President

Toyota Tsusho Corporation

Mr. Ichiro Takahara

Vice Chairman, Member of the Board

Marubeni Corporation

Mr. Yoji Taguchi

Chairman and Managing Director of Mitsubishi Corporation India Private Limited

Mitsubishi Corporation

 

 

 

S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827678) Visitor Counter : 198