पंतप्रधान कार्यालय

डेफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूबरोबर पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी साधलेला संवाद


Posted On: 21 MAY 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

पंतप्रधान  : रोहित , तुम्ही तर सर्वात वरिष्ठ खेळाडू आहात. किती वर्षे झाली रोहित जी, तुम्ही खेळत  आहात ?

रोहित  : 1997 पासून अनेक वर्षे मी  ऑलिम्पिक्स स्पर्धेत खेळलो आहे.

पंतप्रधान  : जेव्हा समोरच्या संघाच्या खेळाडूंबरोबर तुम्ही खेळता, तेव्हा तुमचे जुने खेळाडू देखील समोर येत असतील. कसा अनुभव असतो ?

रोहित  : सर , जेव्हा मी सुरुवातीला खेळायचो 1997 पासून , तेव्हा  उत्तम श्रवणशक्ती असलेल्या खेळाडूंबरोबर माझ्या स्पर्धा व्हायच्या आणि मी नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि मी ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला. सर्वसामान्य खेळाडूंच्या जशा स्पर्धा असतात, त्यातही मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि आता मी अशा सर्व खेळाडूंविरुद्ध खेळू शकतो.

पंतप्रधान : अच्छा रोहित , स्वतःबद्दल सांगा. या क्षेत्रात कसे आलात , सुरुवातीला कुणापासून प्रेरणा मिळाली ? आणि इतका प्रदीर्घ काळ सर्वस्व पणाला लावून खेळणं , कधी थकायला झाले नाही ?

रोहित  : सर , जेव्हा मी लहान होतो , तेव्हा , मला वाटते मला आठवत देखील नाही , मी जेव्हा पाहायचो, असेच आईवडिलांबरोबर येता जाताना मी पाहायचो, सर्वाना खेळताना पाहून आनंद व्हायचा , कसे हे सर्वसाधारण लोक खेळतात , मलाही वाटायचे आपणही खेळावं,  तेव्हाच मी माझे ध्येय ठरवले आणि पुढे जात राहिलो.  जेव्हा मी 1997 मध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हा आधी कर्णबधिर लोक खेळत नव्हते , मला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नव्हती, केवळ सहानुभूती मिळायची. माझे वडील यात मला खूप मदत करायचे , खाणे-पिणे, सरबते, जो काही आहार आवश्यक होता ,त्याकडे खूप बारकाईने लक्ष द्यायचे , देवाची खूप कृपा आहे  माझ्यावर. म्हणूनच मला बॅडमिंटन खूप आवडते.

पंतप्रधान  : अच्छा रोहित , जेव्हा तुम्ही दुहेरी गटात खेळता,तेव्हा मी ऐकले आहे की तुमचा जोडीदार   महेश तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, एवढे अंतर आहे तुमच्यात , तुम्ही इतके ज्येष्ठ खेळाडू आहात तर महेश खूप लहान आहे . तुम्ही त्याला कसे सांभाळून घेता, कसे मार्गदर्शन करता,त्याच्याशी स्वतःला कसे जुळवून घेता?

रोहित  : महेश खूप लहान आहे.  2014 पासून माझ्याबरोबर खेळायला सुरुवात केली आहे, माझ्या घराजवळच रहायचा , मी त्याला बरेच काही शिकवले आहे.  कशा हालचाली करायच्या , कशी मेहनत करायची.  डिफलिंपिकमध्ये कशी तयारी करायची,त्यात थोडा ताळमेळ बिघडतो, मात्र त्याला जे काही मी  शिकवले आहे , त्यात तो मला खूप मदत करतो.

पंतप्रधान  : रोहित , तुमचे आयुष्य एक खेळाडू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मला वाटते तुमच्यात नेतृत्वगुण आहेत,  तुमच्यात आत्मविश्वास आहे आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ताण घेत नाही.  सातत्याने त्यात चैतन्य निर्माण करता. माझी खात्री आहे की देशातील युवकांसाठी तुम्ही खूपच प्रेरणादायी आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींपुढे कधीच हार मानली नाही.

ठीक आहे, परमेश्वराने थोडे व्यंग  दिले, मात्र तुम्ही कधी हार मानली नाही. मागील 27 वर्षांपासून तुम्ही देशासाठी पदक जिंकत आहात. आणि मी पाहतो आहे की अजूनही तुम्ही संतुष्ट नाही, काही ना काही करून दाखवण्याची जिद्द आहे, आणि मी पाहतोय कि वाढत्या वयानुसार तुमची कामगिरी देखील आणखी उंचावत चालली आहे. तुम्ही सतत नवनवीन ध्येये डोळ्यासमोर ठेवून ती साध्य करण्यासाठी अथक  परिश्रम करता. मला वाटते कि खेळाडूच्या जीवनात हाच  एक गुण खूप मोठी ताकद असते. तो कधीही समाधान मानत नाही. नवीन उद्दिष्टे ठरवून त्याच्या सिद्धीसाठी स्वतः मेहनत घेता. आणि त्याचाच परिणाम आहे की काही ना काही प्राप्त करत राहता. माझ्याकडून, देशाच्या वतीने रोहित यांना खूप शुभेच्छा आणि खूप -खूप  अभिनंदन करतो.

रोहित  : खूप-खूप धन्यवाद ! मी देखील तुमचे  अभिनंदन करतो,  सर.

निवेदक  :  वीरेन्द्र सिंह (कुस्ती )

पंतप्रधान  :  वीरेन्द्र! कसे आहात ?

वीरेन्द्र सिंह : मी ठीक आहे .

पंतप्रधान  : तुम्ही ठीक आहात ?

वीरेन्द्र सिंह : हो, हो

पंतप्रधान  : स्वतःबद्दल थोडे सांगा , देशवासियांना ! तुम्हाला पहायचे आहे.

वीरेन्द्र सिंह : माझे वडील आणि माझे काका पैलवान होते. त्यांना पाहूनच मी कुस्तीचे धडे गिरवले. आणि मी निरंतर प्रयत्न केला की मी नेहमीच पुढे राहीन. लहानपणापासूनच  माझ्या  आई-वडिलांनी मला पाठिंबा दिला, वडिलांनी पाठिंबा दिला आणि मी कुस्ती शिकत गेलो. आणि आज या स्तरावर पोहचलो आहे.

पंतप्रधान  : तुमचे वडील आणि काका समाधानी आहेत का ?

वीरेन्द्र सिंह : नाही, त्यांना वाटते की मी आणखी चांगली कामगिरी करावी, आणखी खेळावे , आणखी पुढे जावे . मी जसजसे पाहतो की इतर जे सामान्य खेळाडू आहेत ते निरंतर पुढे जात आहेत,  विजय मिळवत आहेत , मी देखील अशा सामान्य लोकांबरोबर खेळतो , मी देखील त्यांना हरवले आहे आणि माझी निवड झाली , मात्र मी  ऐकू शकत नाही म्हणून मला काढून टाकण्यात आले , याचा मला खूप पश्चाताप झाला, आणि मी रडलो देखिल होतो.

आणि नंतर कर्णबधिर गटात जेव्हा मला स्थान मिळाले तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही की मी जिंकलो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा पदक जिंकले , तेव्हा मला वाटले होते कि चला सगळे सोडून देऊ , मी कशाला त्या सामान्य लोकांच्या मागे जाऊ ? आता मी कर्णबधिर गटातच नाव कमवू शकतो आणि त्यात मी निरंतर पुढे जाऊ शकतो. मी अनेक पदके जिंकली,  2005 मध्ये, त्यानंतर  2007 मध्ये , त्यानंतर मी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले , ते तुर्कस्तान इथे जिंकले होते.

पंतप्रधान  : अच्छा वीरेन्द्र , मला सांगा, 2005 पासून आतापर्यंत प्रत्येक डेफलिम्पिकमध्ये तुम्ही पदक पटकावलं आहे. हे सातत्य तुम्ही कुठून आणता ? यामागे तुमची प्रेरणा काय आहे?

वीरेन्द्र सिंह : मी आहाराकडे तेवढे लक्ष देत नाही जेवढे मी सरावाकडे लक्ष देतो.मी सातत्याने सामान्य लोकांबरोबर सराव करतो. खूप  मेहनत करतो. ती  मेहनत वाया जात नाही , मी पाहतो ते कसे खेळतात आणि त्याचा नियमित सराव करतो. सकाळ-संध्याकाळ मी सरावाकडे अधिक लक्ष देतो. माझे हे ध्येय आहे की मी जेव्हा बाहेर कुठे खेळायला जाईन , तेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या पाया पडून निघतो , आणि परदेशात  खेळताना देशाची आठवण ठेवूनच खेळतो. आणि विजयी झाल्याचा मला आनंद होतो. माझ्या मनात माझी आशा जिवंत असते.

पंतप्रधान  : अच्छा वीरेन्द्र , जगात असा कोणता खेळाडू आहे ज्याच्याबरोबर खेळताना तुम्हाला काही ना काही शिकायला मिळते. त्याचा खेळ पाहायला तुम्हाला आवडतो , तो कोण आहे?

वीरेन्द्र सिंह : जेवढे कुस्तीपटू आहेत, मी त्यांना पाहतो की त्यांची रणनीती काय आहे ? ते कसे डावपेच लढवतात यातून मी शिकतो. त्यांना पाहूनच मी खेळतो. आणि मला  वाटते की मला यावर लक्ष द्यायचे आहे , आणि मी घरीही नेहमी त्याबद्दलच विचार करत असतो, की तो खेळाडू कसा खेळला असेल ?  त्यामुळे मलाही त्याच्यापेक्षा चांगला आणि त्याच्या बरोबरीने टक्कर देऊन खेळायचे आहे. मला त्याला घाबरायचे नाही.  एकदम समोरासमोर काट्याची टक्कर द्यायची आहे. आणि त्याच डावपेचांसह जिंकायचे देखील आहे.

पंतप्रधान  : वीरेन्द्र, चांगली गोष्ट आहे की तुम्ही खेळाच्या जगातील  उस्‍ताद देखील आहात , आणि त्याचबरोबर  विद्यार्थी देखील आहात. ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. तुमची जी  इच्छा शक्ती आहे. ती खरोखरच प्रत्येकाला  प्रेरित करते. त्याचबरोबर माझे असे मत आहे की तुमच्याकडून देशातील खेळाडू आणि युवक जे शिकू शकतात ते म्हणजे तुमचे सातत्य, एकदा  सर्वोच्च स्थानावर पोहोचणे कठीण असते, मात्र  त्याहीपेक्षा कठीण असते ते तेथे टिकून राहणे आणि तरीही सतत सुधारणेसाठी प्रयत्न करत राहणे. तुम्ही शिखरावर पोहचण्यासाठी तपश्चर्या केली . तुमचे काका, तुमच्या वडिलांनी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन केले, तुमची मदत केली. शिखरावर पोहचणे वेगळे, आणि पोहचल्यावर तिथे टिकून राहणे ही  मला  वाटते अद्भुत ताकद आहे. आणि म्हणूनच खेळाडूंचे विश्व या गोष्टी समजून घेईल, तुमच्याकडून शिकेल, माझ्याकडून तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा . खूप-खूप धन्यवाद.

पंतप्रधान  : धनुष, नाव तर धनुष आहे , आणि नेमबाजी करतो ?

धनुष : हो, मी नेमबाजी खेळतो.

पंतप्रधान:  धनुष! स्वतःबद्दल आम्हाला सांगा !

धनुष : हो, मी सातत्याने नेमबाजीचा सराव करत राहिलो. मला माझ्या कुटुंबीयांची खूप मदत झाली. प्रत्येक टप्प्यावर ते मला सांगायचे मला जिंकायचे आहे, मला पहिले यायचे आहे. मी चार वेळा परदेशात गेलो आहे , आणि माझा हा  निश्‍चय असतो की मला पहिलेच पदक पटकावयाचे आहे , मला सुवर्णपदकच जिंकायचे आहे.

पंतप्रधान : धनुष जी, या खेळात पुढे जाण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते ,तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता?

धनुष : मी या मुलांना सांगेन की यात नक्कीच पुढे जाता येते. आपण प्रयत्न करत रहायला  हवेत. नियमित सराव तुम्हाला पुढे नेईल . तुम्हाला नियमितपणे धावण्याचा सराव करायला हवा . तंदुरुस्त रहायला हवे. एवढेच मला सांगायचे आहे, सर .

पंतप्रधान : योगा करता का ?

धनुष : हो, मी बऱ्याच काळापासून योगसाधना करतो.

पंतप्रधान : आणि ध्यानधारणा करता का ?

धनुष : हो, करतो, मात्र खूप नाही, कधी-कधी करतो लक्ष केंद्रित करण्यासाठी.

पंतप्रधान : तुम्हाला माहित आहे नेमबाजीमध्ये  मेडिटेशन, ध्यान हे खुप उपयुक्त ठरते.

धनुष : हो, खरेच ध्यान केंद्रित करावे लागते. भोक  पाडून  एका दमात निशाणा साधण्यासाठी एकाग्र चित्त व्हावे लागते .

पंतप्रधान : अच्छा धनुष, मला सांग, इतक्या लहान वयात तू इतकं सगळं यश संपादन केलं आहे, जगभरात फिरून आला आहेस. तुला सर्वाधिक प्रेरणा कशातून मिळते? कोण तुला प्रेरित करते?

धनुष: माझं माझ्या आईवर सर्वात जास्त प्रेम आहे. तिच्या सहवासात मी सर्वात आनंदी असतो. माझे वडील पण मला खूप आधार देतात, पाठिंबा देतात, माझ्यावर प्रेम करतात.  मात्र, आधी 2017 मध्ये जेव्हा मी जरा अस्वस्थ असायचो, उदास असायचो, त्यावेळी माझ्या आईचा मला खूप आधार मिळत असे. आणि मग सातत्याने प्रयत्न करत, करत जेव्हा मी जिंकू लागलो, त्यावेळी मला खूप आनंद मिळत असे. अशाप्रकारे आईच माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत बनत गेली.

पंतप्रधान  – धनुष, सर्वात आधी तर मी तुझी आई आणि तुझ्या कुटुंबाला प्रणाम करतो, आणि विशेषतः तुझ्या आईंना. जसं तू तुझ्या आईचं आता वर्णन केलंस, की कशाप्रकारे त्या तुला सांभाळून घेत होत्या, कसे प्रोत्साहन देत होत्या आणि तुला तुझी लढाई जिंकण्यासाठी मदत करत असत, कोणत्याही  आव्हानाचा सामना करण्यासाठी  तुला कशाप्रकारे तयार करत असत, हे सगळं ऐकलं तेव्हा मला वाटलं खरंच तू खूप भाग्यवान आहेस. तर, तू खरोखरच खूप भाग्यवान आहेस आणि तू सांगितलं की तू खेलो इंडियामध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला, नव्या गोष्टी समजून घेण्यचा प्रयत्न केला. आणि खेलो इंडिया ने आज देशाला खूप चांगले चांगले खेळाडू दिले आहेत. अनेक प्रतिभावंत खेळाडूंना पुढे जाण्यात मदत केली आहे. तू तुझं सामर्थ्य ओळखलं. पण मला विश्वास आहे की तुझं सामर्थ्य, धनुष यापेक्षाही जास्त आहे आणि तू याहून मोठे पराक्रम करू दाखवशील, हा माझा विश्वास आहे. तुला माझ्या अनेक शुभेच्छा !  

धनुष – अनेक अनेक धन्यवाद. 

उद्घोषक – कु प्रियशा देशमुख – नेमबाजी

पंतप्रधान: अच्छा प्रियशा, तू पुण्याची आहेस?

प्रियशा – खरं म्हणजे मी महाराष्ट्राची आहे. माझं नाव प्रियशा देशमुख आहे. मी आठ वर्षांपासून नेमबाजीचा सराव करत आहे. त्यापूर्वी मी बॅडमिंटन, सर्व काही केलं मात्र तेव्हा मी हरली तर मग मी विचार केला नेमबाजी सोपी आहे. तर मी 2014 ला नेमबाजी सुरु केली. त्यानंतर 2014-15 मध्ये राष्ट्रीय शिबीर होतं तिथे मी माझ्या श्रेणीत 7 गोल्ड मेडल्स आणि खुल्या श्रेणीत रौप्य पदक मिळवलं आणि आधी मी पहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रशियामध्ये होती, तर मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळली. तेव्हा मला थोडी भीती वाटली होती आणि काळजी देखील वाटली होती. मात्र माझ्या आजीच्या आशीर्वादानं आणि माझ्या वडिलांनी मला समजावले की काहीही होऊ दे, तू पहिल्यांदा जेते आहेस तर जा, खेळ, जे मिळेल ते मिळेल. पण आता कामगिरी करून दाखव. पण मला माहित नव्हतं काय मिळेल मात्र जेव्हा शेवटच्या क्षणी माझा पात्रता फेरीत प्रवेश झाला तेव्हाच ठरलं. नंतर अंतिम फेरी झाल्यावर मला पदक मिळालं.

पंतप्रधान: अच्छा 2017 मध्ये तू सहाव्या क्रमांकावर होतीस. यावेळी सुवर्ण घेऊन आलीस. ही काही लहान गोष्ट नाही. तर तू अजूनही समाधानी नाहीस, अजूनही स्वतःशीच तक्रार करत असतेस.

प्रियशा – नव्हती, मला तर आत्मविश्वासच नव्हता, मला अजूनही भीती वाटत राहते. आजी आणि वडिलांचे आशीर्वाद आणि माझ्या गुरु अंजली भागवत, या प्रशिक्षकांनी मला शिकवलं, जे करायचं ते कर, पण सकारात्मक विचार ठेवलेस तर सगळं शक्य होईल. आणि आता, नुकतंच दुसरं ऑलिंपिक ब्राझीलमध्ये झालं तर धनुष सोबतच्या चमूत मला सुवर्णपदक मिळालं. तेव्हा माझी आजी, आता ती या जगात नाही, ऑलिंपिक व्हायच्या आधी तिनं माझ्याकडून वचन घेतलं होतं की आम्ही पदक अवश्य जिंकून येऊ मात्र आजीनं माझ्याकडून वचन घेतलं की यावेळी पदक नक्की मिळेल. मात्र अचानक तिला देवाज्ञा झाली. मात्र, त्यानंतर मी तिचं स्वप्न पूर्ण केलं त्यामुळे मला छान वाटत आहे.

पंतप्रधान: हे बघ प्रियशा, सर्वात आधी तर मी अंजली भागवत जी यांचं अभिनंदन करतो, त्यांनी तुझ्यासाठी इतकी मेहनत घेतली.

प्रियशा – आभारी आहे सर!

पंतप्रधान: मी खरंच सांगतो, की एक तर तुझं, तुझ्या आई वडलांचं, मात्र प्रशिक्षक सुद्धा जर मन लावून तुमच्यासाठी काम करत असेल तर त्यामुळे खूप मोठा बदल होताना मी बघतो आहे. अच्छा मला सांग तू पुण्याची आहेस, आणि पुण्याचे लोक शुद्ध मराठी बोलतात.

प्रियंशा – हो, माहित आहे मी मराठी आहे.

पंतप्रधान – तर मग तू इतकी चांगली हिंदी कशी काय बोलतेस.

प्रियंशा – मी मराठी, हिंदी सगळं बोलू शकते. मात्र समस्या अशी आहे मराठीत तर माझी मातृभाषा आहे. मला असं वाटतं की जगात एकाच भाषेत बोलू नये, सर्व भाषांत बोलावं, मात्र मी मराठी कमी बोलते.

पंतप्रधान: मला असं सांगण्यात आलं, तुझ्या आजीनं तुला कायम प्रोत्साहन दिला, कधीच निराश होऊ दिलं नाही, कधी तुला उदास होऊ दिलं नाही. तू अनेक आव्हानांचा सामना करू शकलीस आणि जसं मला सांगण्यात आलं आहे की तू नवीन नवीन प्रकारे हे शिकण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुला अनेक अनेक शुभेच्छा देतो, तुझं अभिनंदन करतो. तू सर्वांना प्रेरणा देत राहशील.

प्रियशा – धन्यवाद!

उद्घोषक – जाफरीन शेख- टेनिस

पंतप्रधान – जाफरीन नमस्ते्.

जाफरीन – माझं नाव जाफरीन शेख आहे, टेनिस खेळाडू. मी कर्णबधीर ऑलिंपिक 2021 मध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. मला माझे वडील खूप मदत करायचे, खूप मेहनत करत होते. भारतात तर मी अनेक पदकं जिंकली आहेत. धन्यवाद मोदीजी!

पंतप्रधान – अच्छा जाफरीन, तू आणि पृथ्वी शेखर, तुमच्या जोडीनं तर मोठी कमाल करून दाखवली. तुम्ही दोघं मैदानावर एकमेकांना मदत कसे कारण होतात. एकमेकांना मदत कशी करता.

जाफरीन – आम्ही दोघे मदत करतो (अस्पष्ट)

पंतप्रधान – हे बघ, मी काही टेनिस खेळाडू नाही. ते माझ्या नशिबात नव्हतं, मात्र असं म्हणतात की टेनिस एक असा खेळ आहे जी ज्यात तंत्र फार महत्वाचं असतं आणि तंत्राकडे खूप लक्ष दिलं जातं. तुम्ही केवळ हा खेळ खेळतच नाही, तर अनेकदा देशाचं नाव मोठं केलं आहे. हे सगळं शिकायला तुम्हाला मेहनत किती करावी लागली.

जाफरीन – सर, मी खूप मेहनत घेतली, नेहमीच खूप मेहनत घेतली (अस्पष्ट)

पंतप्रधान – अच्छा ! तू एक प्रकारे देशाच्या मुलींचा, त्यांच्या सामर्थ्याचा एक प्रकारे पर्याय तर आहेसच, त्या सोबतच तू लहान लहान मुलींसाठी प्रेरणा देखील आहेस. तू सिद्ध केलं आहेस की भारताच्या मुलींनी जर काही ठरवलं तर कुठलाच अडथळा त्यांना थांबवू शकत नाही. माझ्याकडून जाफरीनला अनेक अनेक शुभेच्छा. तुझ्या वडिलांचे खास अभिनंदन ! कारण त्यांनी तुझ्यासाठी इतकी मेहनत घेतली आणि तुला इथवर पोहोचवलं.

जाफरीन – सर, तुम्ही सर्वांना मदत करता, (अस्पष्ट)  मदत करा.

पंतप्रधान – मी करेन.

जाफरीन – धन्यवाद सर, धन्यवाद!

पंतप्रधान  – मी करेन. तुझी ही उर्जा मी असं म्हणू शकतो की जे स्थान तुम्ही लोकांनी मिळवलं आहे, तुमची महत्वाकांक्षा खूप पुढे जाण्याची आहे. ही महत्वाकांक्षा अशीच राहू द्या, हा जोश असाच टिकवून ठेवा. हा जोशच देशाच्या विजयाच्या नव्या वाटा उघडेल. भारताचे उज्ज्वल भविष्य तयार होईल. आणि मला असं वाटतं आपल्या सर्वसामान्य क्रीडा जगतात कुठल्या व्यक्तीचं नाव होतं तर तिथल्या क्रीडा संस्कृतीचा क्रीडा क्षमतेचा विषय असतो. मात्र कोणी दिव्यांग, कोणी शारीरिक असहायतेत आयुष्य घालवणारी व्यक्ती, ते जेव्हा जगात नाव कमावतात, तेव्हा केवळ खेळाडूच जिंकून येत नाही, तो फक्त एक क्रीडा प्रकार राहत नाही, तो त्या जगाची प्रतिमा घेऊन जातो, की, हो असा एक देश आहे जिथे दिव्यांग लोकांबद्दल देखील हीच भावना आहे, हीच संवेदना आहे आणि याच सामर्थ्याचे पूजन तो देश करत असतो. 

ही फार मोठी शक्ती असते आणि यामुळे जगात तुम्ही कुठेही असलात, जगात जेव्हाही तुमचा पराक्रम कुणी बघितला असेल, तर तुम्हाला बघत असेल, तुमचा खेळ बघत असेल, तुमची पदकं बघत असेल, मात्र मनातल्या मनात विचार करत असेल, अच्छा! भारतात असं वातावरण आहे, प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळते, प्रत्येकाला संधी मिळते. आणि यामुळे देशाची प्रतिमा तयार होते. म्हणजे सामान्य खेळाडू देशाची प्रतिमा बनवतात, त्यापेक्षा अनेक पटींनी चांगली देशाची प्रतिमा बनविण्याचं काम तुमच्याकडून होतं. तुमच्या प्रयत्नांनी होतं म्हणजे, ही फार मोठी गोष्ट आहे.

तुम्हा सर्वांना या भव्य विजयासाठी आणि देशाचं नाव मोठं करण्यासाठी, देशाचं नाव उंच करण्यासाठी, भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी, आणि हे पण तव्हा जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा वेळी तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही सर्व खूप खूप अभिनंदांस पात्र आहात. तुमच्या या पराक्रमात तुमचे कुटुंबीय, आप्त, तुमचे माता - पिता, तुमचे प्रशिक्षक, तुमच्या आजूबाजूला जे वातावरण असेल, या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. आणि यासाठी त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

ज्या ज्या खेळाडूंनी या जागतिक स्पर्धेत भाग घेतला, त्यांनी संपूर्ण देशासमोर हिमतीचं एक अभूतपूर्व उदाहरण ठेवलं आहे. काही लोक असतील जे कदाचित पदकापर्यंत पोचू शकले नसतील, मात्र हे समजून चला की पदकानं तुम्हाला बघितलं आहे. आता ते पदक तुमची वाट बघत आहे. ते पदक तुमची वाट बघत आहे. तुम्ही असा विचार करू नका की आता तुम्ही मागे पडलात. तुम्हाला यश नक्की मिळेल, आणि तुम्ही विजयी होऊन परत याल आणि जे विजयी झाले आहेत ते सगळे तुमची प्रेरणा बनतील. आणि या खेळातले आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडून आला आहात. हिंदुस्तानचे सगळे विक्रम मोडून तुम्ही आला आहात.

म्हणून या चमूचा मला मनापासून अभिमान आहे, तुमचं अभिनंदन करतो आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, त्यामध्ये देखील तुम्ही प्रेरणा बनाल, देशाचा तिरंगा सर्वात पुढे फडकवण्यात प्रत्येक तरुणाला तुम्ही प्रेरणा द्याल, आणि हीच अपेक्षा करून मी सर्वात पहिले तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप पुढे जाण्यासाठी आमंत्रण देतो.

खूप खूप धन्यवाद.

 

* * *

JPS/SK/Radhika/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827417) Visitor Counter : 290