कृषी मंत्रालय

जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यासाठी 20 मे 2022 रोजी गुजरातमध्ये होणार राष्ट्रीय कार्यक्रम


जागतिक मधमाशी दिनानिमित्त केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 विविध ठिकाणी मध चाचणी प्रयोगशाळांचे करणार उद्घाटन

Posted On: 19 MAY 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2022

 

भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), 20 मे 2022 रोजी टेंट सिटी -II, एकता नगर, नर्मदा, गुजरात येथे जागतिक मधमाशी दिवस साजरा करणार  आहे. या जागतिक मधमाशी दिनाच्या समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्रसिंग तोमर भूषविणार आहेत. माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय(MoA&FW) देशातील लहान शेतकऱ्यांच्या लाभासाठी मधमाशी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष दिवस साजरा करणार आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्रातील पुणे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, बंदिपुरा आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारणपूर आणि गुजरातमधून मोडमध्ये उत्तराखंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया केंद्रांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करतील.

Image

जनतेला निरोगी ठेवण्यासाठी आणि याविषयीच्या विविध आव्हानांना तोंड देण्यामध्ये मधमाश्या आणि इतर परागकणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (यूएन जनरल असेंब्ली) 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून घोषित केला आहे.

या उत्सवादरम्यान, एक प्रदर्शन आयोजित केले जाणार असून त्यात मधमाशांच्या विविध जाती आणि मधमाशीपालन क्षेत्रातील विविध उत्पादने,मधमाशीपालक, प्रक्रिया करणारे आणि मधमाशीपालन क्षेत्रातील विविध भागधारकांद्वारे अनेक स्टॉल्स लावले जातील.  या कार्यक्रमादरम्यान ‘मधुक्रांती’ पोर्टलची अंमलबजावणी करणारी एजन्सी, इंडियन बँक यांच्या वतीने मधमाशीपालकांच्या तात्काळ  नोंदणीसाठी स्टॉलही उभारण्यात येणार आहे.

Image

शेतकरी/मधमाशीपालकांना मधमाशीपालनाचे शास्त्रीय ज्ञान देऊन त्यांचा विकास करण्यासाठी "शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालनाचे उत्पादन तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकास- अनुभवाची देवाणघेवाण आणि आव्हाने" तसेच "विपणन आव्हाने आणि उपाय (स्थानिक/जागतिक)" या विषयांवर तांत्रिक सत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत.

देशभरात मधमाशी पालनाचा प्रसार आणि प्रचार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826737) Visitor Counter : 292