गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतली बैठक
जम्मू आणि काश्मीरमधला दहशतवाद संपवण्यासाठी समन्वयीत कारवाईचे सुरक्षा दलांना निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्ध आणि शांततापूर्ण जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दलांनी सीमापार घुसखोरी समूळपणे रोखणे सुनिश्चित करावे आणि केंद्रशासित प्रदेशातला दहशतवाद पूर्णपणे मिटवावा
Posted On:
17 MAY 2022 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीमध्ये बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख, भारत सरकारचे आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले.
सुरक्षा दल आणि पोलिसांनी दहशतवादाविरोधात समन्वयीत पद्धतीने सक्रीय कारवाई करावी असे निर्देश अमित शहा यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्ध आणि शांततापूर्ण जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून होणारी घुसखोरी शून्यावर आणून केंद्रशासित प्रदेशातला दहशतवाद पूर्णपणे मिटवावा असे ते म्हणाले.
S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826162)
Visitor Counter : 172