शिक्षण मंत्रालय
अध्यापकांच्या विकासाकरिता “मालवीय मिशन” ही देशव्यापी परिसंस्था स्थापन करण्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संकेत
Posted On:
17 MAY 2022 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2022
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक/अध्यापकांच्या क्षमता वृद्धीकरिता संस्थात्मक यंत्रणेच्या अहवालाचा आढावा घेतला. मंत्री प्रधान यांनी "मालवीय मिशन" ही शिक्षक /प्राध्यापकांच्या विकासासाठी देशभरात सक्षम परिसंस्था विकसित करण्याची कल्पना मांडली.
उच्च कौशल्याधारित अध्यापकांसाठी 21 व्या शतकातील भारतातील आव्हानांशी सुसंगत बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक अध्ययनावर भर असल्याचे सांगत त्यांनी भारतीय मूल्ये, भाषा, ज्ञान, आचारसंहिता आणि परंपरांवर लक्ष केंद्रित करून शिक्षक अध्ययनाबाबत बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826061)
Visitor Counter : 203