सांस्कृतिक मंत्रालय
वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त, लुंबिनीमध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा या अनोख्या केंद्राच्या उभारणीसाठीच्या "शिलान्यास" समारंभात पंतप्रधान उद्या सहभागी होणार
Posted On:
15 MAY 2022 2:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे 2022 रोजी वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त, लुंबिनीच्या त्यांच्या अधिकृत दौऱ्या दरम्यान लुंबिनी विहारात 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धीस्ट कल्चर अँड हेरिटेज' या अनोखे बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र उभारण्यासाठीच्या "शिलान्यास" समारंभात सहभागी होणार आहेत .लुंबिनी येथे पंतप्रधान पवित्र मायादेवी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत. नेपाळ सरकारच्या नेतृत्वाखाली लुंबिनी विकास न्यासाने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमालाही पंतप्रधान संबोधित करतील.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या आर्थिक सहाय्याने लुंबिनी विकास न्यासाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी ), भारत द्वारे सार्वत्रिक आवाहनानुसार अनोख्या 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धीस्ट कल्चर अँड हेरिटेज'चे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत अनुदान देणारी संस्था आहे.हे बौद्ध केंद्र ही नेपाळमधील पहिली ‘निव्वळ शून्य उत्सर्जन’ इमारत असेल.
तसेच, या प्रसंगी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या (आयबीसी) सहकार्याने संस्कृती मंत्रालयाने नवी दिल्ली येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा दिवसाच्या उत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.लुंबिनी, नेपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी यावरील चित्रपटाचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण असेल.
या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 2:00 वाजता पडद्यावर विविध बौद्ध स्थळांच्या मंत्रोच्चाराने होईल.
नेपाळमधील बौद्ध संघटनांना संलग्न करण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ सक्रियपणे सहभागी आहे आणि अनेक ज्येष्ठ बौद्ध भिक्खूंसोबत त्यांचे दृढ संबंध आहेत.पंतप्रधानांचा दौरा आणि लुंबिनी विहार संकुलात भारतीय केंद्राची उभारणी यामुळे सामायिक बौद्ध वारशाद्वारे संबंध अधिक दृढ होतील.
हा कार्यक्रम 16 मे 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या खालील दुव्यांवर उपलब्ध होईल:
"आभासी वैशाख बुद्ध पौर्णिमा दिवस" याचे खालील दुव्यांवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल
फेसबुक : https://www.facebook.com/ibcworld.org
युट्युब : https://www.youtube.com/c/IBCWorld
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825509)
Visitor Counter : 243