राष्ट्रपती कार्यालय

अखिल भारतीय कोळी समाजाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला पूर्व-ध्वनिमुद्रित  चित्रफीत  संदेशाद्वारे राष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 15 MAY 2022 12:41PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (May 14, 2022) अखिल भारतीय कोळी समाजाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला पूर्व-ध्वनिमुद्रित  केलेल्या चित्रफीत  संदेशाद्वारे संबोधित केले.

आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले  की, , या सोहळ्याला प्रत्यक्षरित्या ते संबोधित करू शकले  असते तर त्यांना  अधिक आनंद  झाला असता.मात्र त्यांच्या घटनात्मक पदाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना  जमैका आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाईन्स या देशांसोबतचे भारताचे परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी  या देशांच्या भेटीवर जावे लागले.

अखिल भारतीय कोळी समाजाच्या स्थापनेपासूनच्या त्यांच्या जुन्या संबंधांचे स्मरण करून, राष्ट्रपतींनी सांगितले की, या समाजाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा हा त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप समाधानकारक आणि आनंददायी आहे. कोणतीही संस्था तयार करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण लागते.त्यामुळे आज आपण सर्वजण एकत्र येऊन अखिल भारतीय कोळी समाजाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.अधिक समाधानाची बाब म्हणजे या समाजाच्या सदस्यांनी समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीत आपले बहुमूल्य  योगदान दिले आहे.

आपल्या आधीच्या पिढ्यांमधील  दृष्ट्या  लोकांनी समाजाला दिशा देण्यासाठी छोटी पावले उचलली. त्यानंतरच्या पिढ्या अधिक पुढे  गेल्या, असे राष्ट्रपती म्हणाले. तरुण पिढी कोळी समाजाची ओळख आणि प्रतिष्ठा आणखी उच्च स्तरावर  नेईल आणि समाजातील सदस्य आधुनिकता, संवेदनशीलता, मानवतेची सेवा आणि देशभक्तीचे आदर्श घालून देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोळी समाजातील प्रत्येक सदस्याने आपल्या समाजाची प्रतिष्ठा वाढवण्याबरोबरच राष्ट्र उभारणीतही योगदान देत राहण्याचा संकल्प घ्यावा  असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825486) Visitor Counter : 211