नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
जर्मनी दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी अनेक सोलर पीव्ही प्रकल्पांना भेट दिली
“परदेशी भूमीवर भारतीयांशी संवाद साधणे हा आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण”: केंद्रीय मंत्री भगवंत खुबा
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती तसेच देशाच्या विकासात अनिवासी भारतीय कशा प्रकारे योगदान देऊ शकतात यावर अनिवासी भारतीयांशी साधला संवाद
तीन दिवसांच्या दौऱ्यात केंद्रीय मंत्री खुबा अनेक द्विपक्षीय आणि गोलमेज बैठकांना उपस्थित राहिले आणि नजीकच्या काळात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूक बाबत घोषणा होतील अशी अपेक्षा केली व्यक्त
Posted On:
14 MAY 2022 7:30PM by PIB Mumbai
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी इंटरसोलर युरोप 2022 साठी म्युनिक, जर्मनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी विविध सोलर पीव्ही प्रकल्पांना भेट दिली.
तत्पूर्वी भगवंत खुबा यांनी आज जर्मनीच्या म्युनिक जवळच्या अल्थेगेनबर येथे ऍग्री-पीव्ही साइटला भेट दिली. ऍग्री-पीव्ही संकल्पना शेतीसाठी तसेच सौर ऊर्जा निर्मितीसाठी जमिनीचा दुहेरी वापर करायला प्रोत्साहन देते. उष्ण कटिबंधीय भारतीय हवामानात उन्नत सौर पॅनल पिकांना आवश्यक सावली देतात. तसेच अॅग्रो पीव्हीमध्ये बायफेशियल व्हर्टिकल पॅनल्सचा देखील वापर करता येतो.
येत्या काही वर्षांत ही संकल्पना भारताच्या अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गरजा पूर्ण करेल, त्यामुळे भारतात असे अनेक प्रकल्प उभारले जातील, असे त्यांनी नमूद केले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर चतुर्वेदी हे देखील उपस्थित होते. खुबा यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान/पद्धतींचा वापर केलेल्या विविध सोलर पीव्ही साइट्सना भेट दिली. एके ठिकाणी सॉईल स्क्रू पद्धतीचा वापर केला जात आहे, जिथे पीव्ही स्ट्रक्चर उभारण्यासाठी सिमेंटचा वापर केला जात नाही, तर त्याऐवजी पीव्हीला मजबूत आधार देण्यासाठी एक मोठा स्क्रू जमिनीत रोवला जातो. ही पद्धत सिमेंटचा वापर कमी करते आणि मातीचा कोणत्याही प्रकारचा ऱ्हास टाळायला मदत करते. भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र देखील अशा नाविन्यपूर्ण पद्धतींच्या शोधात आहे असे त्यांनी सांगितले.
म्युनिकमध्ये भारतीय समुदायाच्या वतीने भगवंत खुबा यांचे हार्दिक स्वागत आणि सत्कार करण्यात आला. परदेशी भूमीवर भारतीयांशी संवाद साधणे हा आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत कशी प्रगती करत आहे याबाबत त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. तसेच देशाच्या विकासात अनिवासी भारतीय कशा प्रकारे योगदान देऊ शकतात यावर देखील चर्चा केली. गेल्या 3 दिवसात अनेक द्विपक्षीय आणि गोलमेज बैठका पार पडल्या.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825409)
Visitor Counter : 151