अर्थ मंत्रालय

संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मारी यांनी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली

Posted On: 12 MAY 2022 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2022

संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मारी यांनी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांची आज नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. उभय देशांनी भारत-युएई मधील मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आणि बहुआयामी द्विपक्षीय संबंधांना चालना देणारी व्यापक धोरणात्मक भागीदारी यावर चर्चा केली.

अब्दुल्ला बिन तौक अल मारी आणि युएईचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत-युएई सिईपीए :अनलिशिंग द गोल्डन इरा' या आर्थिक भागीदारी शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आले आहे. अशा प्रकारचे नियमित आदानप्रदान आणि द्विपक्षीय बैठका भारताचे संबंध अधिक दृढ करतात आणि नवीन क्षेत्रांमध्ये विद्यमान संस्थात्मक व्यवस्थेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करतात.


S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824721) Visitor Counter : 130