रेल्वे मंत्रालय
बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील संगणक आधारित चाचणी परीक्षेचा दुसरा टप्पा 9 आणि 10 मे रोजी घेण्यात आला.
अर्ज भरलेल्या 1,80,882 विद्यार्थ्यांपैकी एकूण 1,28,708 उमेदवारांनी परीक्षा दिली.
प्रथमच उमेदवारांची ओळख आधार कार्डद्वारे पटविण्यात आली.
Posted On:
11 MAY 2022 9:03PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेने बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील सीइएन 01/2019 च्या संगणक आधारित चाचणी परीक्षेचा दुसरा टप्पा 9 आणि 10 मे घेतला, यात श्रेणी 6 (7124 जागा) आणि श्रेणी 4 (161 जागा) यांचा समावेश होता. या परीक्षेसाठी एकूण 1,80,882 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 1,28,708 उमेदवारांनी संगणक आधारित चाचणी परीक्षा दिली. या वेळी प्रथमच उमेदवारांची ओळख आधार कार्ड द्वारे पटविण्यात आली. ही चाचणी परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आली, श्रेणी 6 साठी 9 मे रोजी आणि श्रेणी 4 साठी 10 मे रोजी.
या परीक्षेची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली होती की, एका रेल्वे भरती बोर्डाच्या उमेदवारांना सारख्याच प्रश्नपत्रिका मिळतील आणि प्रमाणीकरणाची गरज पडणार नाही.
श्रेणी 6 ची संगणक आधारित चाचणी 25 राज्यांतील 111 शहरातल्या 156 केंद्रांवर घेण्यात आली. श्रेणी 6 च्या चाचणीची एकूण उपस्थिती जवळपास 74% होती.
श्रेणी 4 ची संगणक आधारित चाचणी परीक्षा 17 राज्यांतल्या 56 शहरातील 89 केंद्रांवर घेण्यात आली. यात एकूण उपस्थिती जवळपास 60.5% होती. उमेदवारांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने विशेष गाड्या चालविल्या होत्या.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824538)
Visitor Counter : 227