माहिती आणि प्रसारण मंत्रालय

युट्युबवर डीडी इंडियाच्या सदस्यसंख्येने 2 लाखांचा टप्पा केला पार; प्रसारभारतीची एकूण सदस्यसंख्या दोन कोटींवर पोहोचली

Posted On: 09 MAY 2022 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2022

 

प्रसार भारतीची  इंग्रजी वृत्तवाहिनी डीडी इंडियाने अलीकडे दूरचित्रवाणीच्या प्रेक्षक संख्येत आणि डिजिटल माध्यमांच्या सदस्य संख्येत दोन्ही ठिकाणी अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. अलीकडेच या वाहिनीने  यूट्यूबवर 2 लाख सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे.दूरचित्रवाहिनीच्या  बाबतीत, डीडी इंडिया देशातील क्रमांक  एकवर असलेली  इंग्रजी वृत्त वाहिनी आहे. ताज्या बीएआरसी डेटानुसार, डीडी इंडियाने  8 लाखांहून अधिक प्रेक्षकसंख्या गाठली असून ही संख्या  इंग्रजी वृत्त प्रकारात सर्वाधिक आहे.या वृत्तवाहिनीच्या खालोखाल असलेली वाहिनी डीडी इंडियाच्या प्रेक्षक संख्येच्या जवळपास निम्म्यापर्यंतच पोहोचू शकली. प्रेक्षकसंख्येने गेल्या आठ आठवड्यांत जवळपास 150% एकूण वाढ नोंदवत डीडी इंडियाच्या प्रेक्षकसंख्येमध्ये सातत्यपूर्ण साप्ताहिक वाढ दिसून आली आहे.

प्रसार भारतीने जानेवारी 2019 मध्ये जारी केलेल्या  कार्यादेशानुसार, उपग्रह, ओटीटी मंच  आणि न्यूजऑनएअर अॅपद्वारे 190 हून अधिक देशांमध्ये पोहोचून डीडी इंडिया आता जगात  भारताची वाहिनी बनली आहे. स्पष्ट विश्लेषण आणि भाष्य, विचार प्रवृत्त करणारी मते/मतांतरे आणि अत्याधुनिक दृश्य सादरीकरणाद्वारे, भारताशी संबंधित मुद्द्यांवर जागतिक प्रभावशाली म्हणून डीडी इंडियाने  स्वत:ला  प्रस्थापित केले आहे.

डीडी इंडिया ही  प्रथम क्रमांकाची इंग्रजी वृत्तवाहिनी कशाप्रकारे बनली याचा घटनाक्रम खाली देण्यात आला आहे:

Period

Milestone

January 2019

After approval from Prasar Bharati Board, the process to launch DD India as an English news channel initiated 

 

February 2019

 Segregation of DD News as Hindi News channel and DD India as English News channel began

 September 2019

DD India introduced on OTT platform of South Korean public broadcaster KBS 

 September 2019

 Private cable operators in Bangladesh began to broadcast DD India through their platforms

 February 2020

 

 DD India coverage of the then US President Donald Trump to India was carried by multiple foreign TV channels

 

March 2020

DD India launched as a full-fledged English News channel - Complete segregation of DD News as Hindi and DD India as English News channel achieved. DD India production and shows completely separated from that on DD News 

 January 2021

 DD India launched on Hotstar in US, UK and Canada

January 2021

DD India launched on ITV for broadcast in 23 States of US 

 January 2022

 

 DD India interview of then Prime Minister of Slovenia was quoted widely by international media

February – March 2022

DD India correspondents were stationed in 4 countries neighboring Ukraine to cover ongoing Russia-Ukraine conflict and Operation Ganga launched by India to evacuate Indians stranded in Ukraine 

 March 2022

Launched on Yupp TV for distribution in more than 130 countries 

 April 2022

 

 DD India became number one English News channel in the country, in terms of reach

 

April – May 2022

 

 DD India registered a viewership growth of almost 150% over 8 weeks. DD India’s YouTube channel crossed 2 Lakh subscribers on YouTube

 

भारत आणि जगभरात पसरलेल्या भारतीय समुदाया दरम्यानचा  पूल म्हणूनही डीडी इंडिया  वाहिनी काम करते. ही वाहिनी आपल्या विविध कार्यक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना  सर्व देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर भारताचा दृष्टीकोन प्रदान करते. इंडिया आयडियाज, वर्ल्ड टुडे, इंडियन डिप्लोमसी, डीडी डायलॉग, न्यूज नाईट इ.कार्यक्रम हे  मोठी प्रेक्षक संख्या असलेले डीडी इंडियावरील कार्यक्रम आहेत. डीडी इंडिया पाहण्यासाठी खालील क्युआर  कोड स्कॅन करा.

डीडी इंडिया व्यतिरिक्त, प्रसार भारतीचे  'डीडी सह्याद्री न्यूज' , 'डीडी सह्याद्री ' 'डीडी ओडिया' या युट्युब वाहिन्यांनी सुद्धा सदस्य संख्येत अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे आणि या युट्युब वाहिन्यांची सदस्य संख्या यापूर्वीच लाखोंच्या घरात असून   प्रसारभारतीचे देशभरातील डिजिटल मंच  एकत्रितपणे   एक देदीप्यमान  विकास गाथा लिहीत आहेत. आणि इतर अनेक वाहिन्या महत्वाच्या टप्प्याच्या नजीक आल्या आहेत. युट्युबवरील प्रसारभारतीच्या सर्व वाहिन्यांची एकत्रित सदस्यसंख्या  2 कोटींहून अधिक आहे.

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823997) Visitor Counter : 156