रेल्वे मंत्रालय

रेल कर्मयोगी अभियाना अंतर्गत आघाडीवर कार्यरत 51,000 हून अधिक रेल्वे कर्मचारी प्रशिक्षित

Posted On: 05 MAY 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2022

 

रेल कर्मयोगी अभियाना अंतर्गत 51,000 हून अधिक आघाडीवर राहून काम करणाऱ्या  रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीकृत प्रशिक्षण संस्था असलेल्या भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थापन संस्था (आयआरआयटीएम) मधून प्रशिक्षित ‘मास्टर ट्रेनर्स' या तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे  या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थापन संस्थेमध्ये 28 फेब्रुवारी 2022 पासून मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012PEI.jpg

भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थापन संस्थेमधील (आयआरआयटीएम) प्रत्येक तुकडीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील  सात विभागातील मास्टर ट्रेनर असतात. आत्तापर्यंत, 49 विभागांचा समावेश असलेल्या मास्टर ट्रेनर्सच्या 8 तुकड्यांचा या प्रशिक्षणासाठी  समावेश करण्यात आला आहे (भारतीय रेल्वेच्या विभागांपैकी अर्ध्याहून अधिक) आणि 8वी तुकडी  सध्या आयआरआयटीएममध्ये प्रशिक्षण घेत आहे.या मास्टर ट्रेनर्सनी याआधी  51,000 हून अधिक क्षेत्रीय प्रशिक्षकांना  या क्षेत्रात प्रशिक्षण दिले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002TKQA.jpg

हा प्रकल्पाच्या माध्यमातून  सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे एक लाख आघाडीवर कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न आहे. नागरिक केंद्रित प्रशिक्षण देऊन या आघाडीवर कार्यरत कर्मचार्‍यांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी - पहिल्यांदा त्यांच्यात "सेवा करण्याचा उद्देश" विकसित करण्यात मदत करणे आणि दुसरे म्हणजे त्यांची "सेवा करण्याची क्षमता" विकसित करणे, हे या रेल कर्मयोगी अभियानाचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांची वैयक्तिक कामगिरी सुधारण्यासाठी तसेच संस्थेची प्रतिसादात्मक आणि कार्यक्षम म्हणून प्रतिमा बळकट  करण्यात मोठी भूमिका बजावण्याच्या अनुषंगाने या अभियानाची  आखणी करण्यात आली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003DSQK.jpg

रेल्वेच्या सर्व 68 विभागांमधून निवडलेल्या  एक हजार आघाडीवर कार्यरत  रेल्वे कर्मचाऱ्यांना,रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीकृत प्रशिक्षण संस्था असलेल्या भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थापन संस्थेमध्ये 'मास्टर ट्रेनर' म्हणून प्रशिक्षित केले जाईल. हे 'मास्टर ट्रेनर' उर्वरित रेल्वे कर्मचार्‍यांना कालबद्ध रितीने प्रशिक्षण देतील. सर्व प्रशिक्षित कर्मचार्‍यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मंच  वापरून मूल्यांकन केले जाईल आणि त्यांना रीतसर प्रमाणित केले जाईल. त्यानंतरच्या वर्षांमध्ये रेल्वे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी विकसित अभ्यासक्रम सामग्री भारत सरकारच्या ऑनलाइन प्रशिक्षण मंच iGoT वर देखील  उपलब्ध करून दिली जाईल. 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822973) Visitor Counter : 167