नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन आणि ड्रोन घटकांकरिता उत्पादन सलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसाठी मागवले अर्ज
वित्तीय वर्ष 2021- 2022 करिता पीएलआयसाठीच्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या कंपन्या अर्ज करु शकतात
अर्ज सादर करण्याची अतिंम तारीख 20 मे 2022 आहे
Posted On:
05 MAY 2022 10:44AM by PIB Mumbai
संपूर्ण वित्तीय वर्षासाठी (1 एप्रिल 2021 ते 31मार्च 2022) पीएलआय साठीच्या पात्रतेची पूर्तता केलेल्या ड्रोन आणि ड्रोन घटक उद्योगांकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत.
असे उत्पादक/उद्योग आपले अर्ज https://www.civilaviation.gov.in/application-pli-scheme इथे सादर करु शकतात.
मंत्रालयाचा 4 मे 2022 रोजीचा आदेश इथे उपलब्ध आहे : https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Application%20for%20PLI%20scheme%20for%20drones%20and%20drone%20components.pdf
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 असून 23.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. लाभार्थ्यांच्या अर्थ विषयक कागदपत्रे आणि इतर दस्तावेजांची तपशीलवार छाननी झाल्यानंतर पीएलआय लाभार्थ्यांची अंतिम यादी 30 जून 2022 पर्यंत जारी होणे अपेक्षित आहे.
यापूर्वी 20 एप्रिल 2022 रोजी, मंत्रालयाने दहा महिन्यांच्या कालावधीसाठी (1 एप्रिल 2021 ते 31 जानेवारी 2022) पीएलआय अर्जदारांनी सादर केलेल्या अर्थ विषयक कागदपत्रांवर आधारित 14 पीएलआय लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये पाच ड्रोन उत्पादक आणि नऊ ड्रोन घटक उत्पादकांचा समावेश आहे. 20 एप्रिल रोजीचा मंत्रालयाचा आदेश इथे उपलब्ध आहे: https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Public%20Notic.pdf
ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठीच्या पीएलआय योजनेच्या पात्रता निकषांमध्ये ड्रोन कंपन्यांसाठी 2 कोटी रुपये आणि ड्रोन घटक उत्पादकांसाठी 50 लाख रुपये वार्षिक विक्री उलाढाल समाविष्ट आहे; आणि मूल्यवर्धन, विक्री उलाढालीच्या 40% पेक्षा जास्त असावे.
ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना 30 सप्टेंबर 2021 रोजी अधिसूचित करण्यात आली. ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना येथे आहे: https://egazette.nic.in/WriteReadData/2021/230076.pdf
***
ST/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822876)
Visitor Counter : 212