आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 189.63 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.97 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,719

गेल्या 24 तासात 3,275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.78%

Posted On: 05 MAY 2022 9:42AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 189.63 (1,89,63,30,362)  कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण  2,34,93,473 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.97  (2,97,07,359)  कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405451

2nd Dose

10020295

Precaution Dose

4866147

FLWs

1st Dose

18416275

2nd Dose

17546101

Precaution Dose

7773368

Age Group 12-14 years

1st Dose

29707359

2nd Dose

8390978

Age Group 15-18 years

1st Dose

58590473

2nd Dose

42769308

Age Group 18-44 years

1st Dose

555915849

2nd Dose

480005191

Precaution Dose

219994

Age Group 45-59 years

1st Dose

202963032

2nd Dose

188420856

Precaution Dose

684592

Over 60 years

1st Dose

126896909

2nd Dose

117401725

Precaution Dose

15336459

Precaution Dose

2,88,80,560

Total

1,89,63,30,362

 

भारतातील  कोविड सक्रीय  रुग्णसंख्या सध्या 19,719  इतकी आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.

गेल्या 24 तासांत  3,010 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून  4,25,47,699 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 3,275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 4,23,430  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.93  (83,93,79,007)    कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.78% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.77% आहे.

***

JPS/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822862) Visitor Counter : 172