दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सी-डॉट आणि सी-डॅक यांनी दूरसंचार आणि आयसीटीच्या विविध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या
Posted On:
02 MAY 2022 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2022
भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेले सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (सी-डॉट), आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची स्वायत्त वैज्ञानिक संस्था, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडवान्सड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी 30 एप्रिल 2022 रोजी बंगळुरू येथे सेमीकॉन इंडिया 2022 कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. स्वदेशी तांत्रिक रचना आणि विकासाला चालना देण्यासाठी दूरसंचार आणि आयसीटीच्या विविध क्षेत्रात एकत्र काम करणे हा यामागील उद्देश आहे.
या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभाला सी-डॉटचे संचालक डॅनियल जेबराज आणि सी-डॅकचे महासंचालक ई. मागेश, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यामुळे दोन्ही संघटनांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात परस्परांच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यास मदत होईल.
C-DOT आणि C-DAC या दोघांनी 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंग आदी क्षेत्रातील कामाची ओळख आणि विकास यासाठी सहकार्य आणि संयुक्तपणे काम करण्यास सहमती दर्शवली आहे. जेव्हा विशिष्ट भूमिका आणि जबाबदाऱ्यांची विभागणी करणे आवश्यक असेल तेव्हा विशिष्ट प्रकल्प करारावर स्वाक्षरी केली जाईल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822060)
Visitor Counter : 310