उपराष्ट्रपती कार्यालय
उच्च शिक्षण ग्रामीण भागात नेत ते अधिक सर्वसमावेशक आणि समन्यायी बनविण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2022 5:17PM by PIB Mumbai
उच्च शिक्षण ग्रामीण भागात नेण्याचे आणि ते अधिक समावेशक आणि समन्यायी बनविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.
ही सर्वसमावेशकता आणि ग्रामीण तरुणांना शिक्षणात समान न्याय्य प्रवेश आज अतिशय महत्त्वाचा आहे कारण मानवाचा विकास, राष्ट्र उभारणी तसेच समृद्ध आणि शाश्वत जागतिक भविष्य घडवण्यात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते,यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना श्री नायडू यांनी समाजाच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण आणि चौकटीबाहेरच्या कल्पना आणल्या पाहिजेत यावर भर दिला.संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट लोकांचे जीवन अधिक आरामदायी आणि आनंदी बनवणे हे असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुलाच्या मातृभाषेतून मूलभूत शिक्षण देण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले की, प्रशासन आणि न्यायालयांमध्ये स्थानिक भाषा मुख्य संवादाचे माध्यम असणे आवश्यक आहे. "प्रत्येक राजपत्रित अधिसूचना आणि सरकारी आदेश स्थानिक किंवा त्या राज्यातील भाषेत असले पाहिजेत जेणेकरून सामान्य लोकांना ते समजेल,"असे ते पुढे म्हणाले.
नायडू यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आणि स्पर्धा किंवा योगासने यांना समान महत्त्व द्यावे आणि बैठी जीवनशैली टाळावी असा सल्लाही दिला.
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1821821)
आगंतुक पटल : 268