निती आयोग
नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सुमन बेरी
Posted On:
01 MAY 2022 12:36PM by PIB Mumbai
नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी यांचे नीती आयोग स्वागत करत आहे. अनुभवी अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन प्रशासक असलेले बेरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ राजीव कुमार यांच्याकडून आज पदभार स्वीकारतील.
"राजीव कुमार यांनी माझ्याकडे अनेक नवीन, प्रतिभाशाली युवावर्ग असलेला आणि सरकारच्या हितसंबंधितांना जोडणाऱ्या एका गतिशील संस्थेचा पदभार दिला आहे,"असे बेरी यांनी म्हटले आहे. “जागतिक अनिश्चिततेच्या काळात माझ्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आला हा माझा सन्मान आहे,असे मला वाटते. सखोल विश्लेषण आणि विस्तृत वादविवादाच्या आधारे पुढील मार्गाची आखणी करणे आणि भारतातील विविध राज्यांसोबत काम करणे हे नीती आयोगासाठी आव्हानात्मक आहे, भारताची आर्थिक आणि सामाजिक निवड,ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे,” असे ते पुढे म्हणाले.
बेरी यांनी यापूर्वी राष्ट्रीय आर्थिक उपयोजित संशोधन परिषद (नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, NCAER) चे महासंचालक (प्रमुख कार्यकारी) आणि रॉयल डच शेलचे प्रमुख जागतिक अर्थतज्ञ म्हणून काम पाहिले आहे. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषद, सांख्यिकी आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणसंबंधी तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्यही होते.
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821757)
Visitor Counter : 2520