शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी जनादेश दस्तावेज प्रकाशित: धर्मेंद्र प्रधान
Posted On:
29 APR 2022 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2022
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झालेल्या समारंभात 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या विकासाची मार्गदर्शक तत्वे: जनादेश दस्तावेज'चे प्रकाशन केले .
या प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा मार्ग आहे आणि जनादेश दस्तावेज ही 21 व्या शतकाच्या बदलत्या मागण्या आणि सकारात्मक परिणाम घडवून आणणारे संविधान आहे.
ते पुढे म्हणाले,की हा दस्तावेज मुलांचा सर्वांगीण विकास, कौशल्यावर भर, शिक्षकांची महत्त्वाची भूमिका, मातृभाषेतून शिक्षण, सांस्कृतिक परंपरांची मुळे मजबूत करत, शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या स्वायत्ततेकडे उचललेले हे एक पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821290)
Visitor Counter : 303