ऊर्जा मंत्रालय

2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी योग उत्सवाचे आयोजन

Posted On: 29 APR 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022 

 

निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने आज नेहरू उद्यानामध्ये योग महोत्सवाचे आयोजन केले होते. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची (8वा आंतरराष्ट्रीय योग दिन) उलटगणती  चिन्हांकित करण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोरारजी देसाई राष्ट्रीय संस्थेच्या योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कॉमन योग प्रोटोकॉल  आसनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, आणि ऊर्जा राज्यमंत्री कृष्ण पाल, तसेच ऊर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आरईसी, पीएफसी, एनटीपीसी, टीएचडीसी, पीजीसीआयएल आणि एनएचपीसी यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत झालेल्या योग उत्सवामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांनी सक्रिय सहभाग घेतला.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त,  आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या अनुषंगाने या योग उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821254) Visitor Counter : 238