दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सेवा प्रदान करण्यास केली सुरुवात
Posted On:
28 APR 2022 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या टपाल विभाग, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस -सर्व नागरिकांसाठी आदर्श योजना) सेवा प्रदान करत आहे.ही योजना भारत सरकारची ऐच्छिक निवृत्तीवेतन योजना निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएफआरडीए ) 2010 पासून नियुक्त टपाल कार्यालयांद्वारे प्रत्यक्ष प्रक्रिया प्रणालीद्वारे व्यवस्थापित केली जाते.टपाल विभागाने 26.04.2022 पासून आता ऑनलाइन माध्यमाद्वारे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (सर्व नागरिकांसाठी आदर्श योजना) सेवा प्रदान करणे सुरू केले आहे.
18-70 वयोगटातील भारतातील कोणताही नागरिक राष्ट्रीय निवृत्तीवेतन यंत्रणा -ऑनलाइन सेवा " या मेन्यू शीर्षकाखाली टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.indiapost.gov.in) भेट देऊन या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/NPS.aspx ही विशेष लिंक देण्यात आली आहे.
नवीन नोंदणी, आरंभिक/नंतरचे योगदान आणि एनपीएस ऑनलाइन अंतर्गत एसआयपी पर्याय यांसारख्या सुविधा ग्राहकांना सर्व सेवांसाठी किमान शुल्कात उपलब्ध आहेत. कलम 80सीसीडी 1(बी ) अंतर्गत वित्त मंत्रालयाने वेळोवेळी केलेल्या घोषणेनुसार एनपीएसमध्ये कर कपातीसाठी सदस्य देखील पात्र आहेत.
कोणत्याही टपाल कार्यालयाला प्रत्यक्ष भेट न देता एनपीएससाठी सर्व पात्र व्यक्तींना ही ऑनलाइन सुविधा मिळू शकते.आणि कमीत कमी शुल्कात त्रासमुक्त अनुभवाचा आनंद मिळू शकतो. टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने एनपीएस सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली आहे.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821013)
Visitor Counter : 217