युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम हा सुखावणारा एक विलक्षण कार्यक्रम : खेळाडू
प्रविष्टि तिथि:
28 APR 2022 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
खेळाडू दिवसभरात त्यांच्या विविध स्पर्धांसाठी कठोर परिश्रम घेत असताना,बंगळुरूमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2021चे आयोजन करणाऱ्या जैन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 25 एप्रिल 2022 ते 02 मे 2022 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे खेळाडूंचे मनोरंजन करण्याची आणि वातावरण उत्साही ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे.
जैन विद्यापीठ परिसरात मोठ्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजकांनी एक भव्य व्यासपीठ बांधले आहे, ज्यावर नृत्य, संगीत आणि फॅशन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे या आठ दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले जात आहे.
हे सांस्कृतिक कार्यक्रम, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी (खेळाडू, कुटुंब, स्वयंसेवक इ.) खुले आहेत. कावेरी हस्तकला, ज्यूट बॅग्ज आणि नैसर्गिक साबण आणि यांसारख्या अन्य वस्तूंसह असंख्य स्टॉल्स देखील आहेत.
व्हॉलीबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या एसआरएम विद्यापीठाचा भाग असलेल्या इझिलमठी डी.पी च्या खेळाडूंनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचा आणि संगीताचाही आनंद लुटला. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये संगीत, कला, नृत्य, वादन, अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1820968)
आगंतुक पटल : 194