युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2021 च्या भारोत्तलन स्पर्धेत, या आधीच्या विद्यापीठ स्पर्धांमधील 26 विक्रम तर एक राष्ट्रीय विक्रम मोडला गेला
Posted On:
28 APR 2022 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
बंगळुरू इथे सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमधे आज महर्षि दयानंद विद्यापीठाच्या कोमल कोहर हिने, आज भारोत्तलन स्पर्धेत, अजिंक्य ठरत, आपलं पहिलं वहिलं सुवर्णपदक तर पटकावलंच, शिवाय या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत तिने एक नवा इतिहासही रचला.
42 किलो वजनी गटाच्या वजनी गटात सहभागी झालेल्या कोमलने, तिन्ही श्रेणीतील गटात विजय मिळवला आणि सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या तीन दिवसांच्या स्पर्धेत, कोमलची कामगिरी महत्वाची आहे. आज तिने या आधीच्या विद्यापीठ स्पर्धांतील 26 विक्रम मोडले आणि सर्व 20 वजनी गटातील, राष्ट्रीय विक्रमही तिने मोडले.
पहिल्या दिवशी स्पर्धेचे वातावरण तयार झाले, तर, शेवटच्या दिवशी, एक मस्त, रोमांचित करणारी अखेरची लढत झाली. महिलांच्या +87 किलो वजनी गटात, अॅन मारिया ने क्लीन आणि जर्क या श्रेणीत, राष्ट्रीय विक्रम मोडला. 129 किलो वजन उचलत तिने, मनप्रीत कौरचा 128 किलो वजनाचा गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विक्रम मोडला.
अॅन मारियाने एकूण 231 किलो वजन उचलत, भुवनेश्वर इथे मार्च महिन्यात झालेल्या भारोत्तलनच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा विक्रम मोडला आहे. तिने 101 किलो स्नॅच प्रकारात मंगलोर विद्यापीठासाठी सुवर्णपदक जिंकले.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820962)
Visitor Counter : 230