श्रम आणि रोजगार मंत्रालय

अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षणाचा (एक्यूईईएस) एक भाग असलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या (क्यूईएस ) तिसऱ्या फेरीचा अहवाल (ऑक्टो-डिसेंबर, 2021) प्रकाशित


उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि रेस्टॉरंट, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा या निवडक नऊ क्षेत्रांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या संघटित क्षेत्रात रोजगाराचा वाढता कल या अहवालात दिसून आला

85 टक्के पेक्षा अधिक कामगार नियमित कामगार आहेत

अंदाजे एकूण कामगारांपैकी सुमारे 39% कार्यरत कामगार असलेले उत्पादन क्षेत्र हे सर्वात मोठे नियोक्ता असून त्यापाठोपाठ 22 % कार्यरत कामगारांसह शिक्षण क्षेत्र आहे

Posted On: 28 APR 2022 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2022

 

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आज ऑक्टोबर-डिसेंबर, 2021 या कालावधीतील त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाचा (क्यू ई एस) तिसरा अहवाल प्रसिद्ध केला, हा अहवाल  श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न असलेल्या  कामगार  विभागाने तयार केला आहे. नऊ निवडक क्षेत्रांतील संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रातील आस्थापनांच्या रोजगार आणि परिवर्तनशील रोजगार संबंधित वारंवार (त्रैमासिक) अद्यतने प्रदान करण्यासाठी कामगार विभागाने अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण हाती घेतले आहे, एकूण रोजगारांपैकी बहुतांश रोजगार हे बिगरशेती आस्थापनांमध्ये आहेत.

त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या माध्यमातून नऊ निवडलेल्या क्षेत्रांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांच्या संदर्भात मुख्यतः संघटित क्षेत्राशी संबंधित  रोजगार माहिती संकलित केली जाते. उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि रेस्टॉरंट, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांचा यात समावेश आहे.

  • 6व्या आर्थिक जनगणनेमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमधील  एकूण रोजगारापैकी सुमारे 85%वाटा नऊ क्षेत्रांचा   होता.
  • हा अहवाल निवडक  नऊ क्षेत्रांपैकी 10 किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणार्‍या संघटित क्षेत्रातील  रोजगाराचा कल दर्शवतो.
  • अंदाजे एकूण कामगारांपैकी सुमारे 39% कार्यरत  कामगार असलेले उत्पादन क्षेत्र हे सर्वात मोठे नियोक्ता असून त्यापाठोपाठ  22 % कार्यरत कामगारांसह शिक्षण क्षेत्र आहे.
  • जवळपास सर्व (99.4%) आस्थापना वेगवेगळ्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत होत्या.
  • एकूण 23.55% आस्थापनांनी  त्यांच्या कामगारांना नोकरीवर असताना  प्रशिक्षण दिले.
  • 9 क्षेत्रांमध्ये, आरोग्य क्षेत्रातील 34.87% आस्थापनांनी नोकरीवर प्रशिक्षण दिले, त्यानंतर 31.1% आयटी /बीपीओक्षेत्राचा क्रमांक लागतो.  
  • 9 क्षेत्रांमध्ये सुमारे 1.85 लाख रिक्त पदांची नोंद झाली आहे.
  • 85.3% कामगार हे नियमित कामगार आणि 8.9% कंत्राटी कामगार होते.

एकूण रोजगारातील क्षेत्रनिहाय हिस्सा

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001LWID.png

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820934) Visitor Counter : 240