आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 187.95 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.70 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,636

गेल्या 24 तासात 2,483 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.58%

Posted On: 26 APR 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 187.95  (1,87,95,76,423) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,30,89,167 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2.70 (2,70,96,975) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 4,68,211 जणांना क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यात आली आहे.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404823

2nd Dose

10013086

Precaution Dose

4715948

FLWs

1st Dose

18415129

2nd Dose

17533583

Precaution Dose

7402619

Age Group 12-14 years

1st Dose

27096975

2nd Dose

3727130

Age Group 15-18 years

1st Dose

58203865

2nd Dose

41567113

Age Group 18-44 years

1st Dose

555533820

2nd Dose

476068522

Precaution Dose

102702

Age Group 45-59 years

1st Dose

202890196

2nd Dose

187497026

Precaution Dose

365509

Over 60 years

1st Dose

126843833

2nd Dose

116804704

Precaution Dose

14389840

Precaution Dose

26976618

Total

1879576423

 


भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 15,636 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 1,970 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,23,311 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,483 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,49,197 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.54 (83,54,69,014) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.58% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.55% आहे.


****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820059) Visitor Counter : 166