आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने आतापर्यंत  187.67   कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12- 14 वयोगटातल्या मुलांना आतापर्यंत 2कोटी 65  लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतामध्‍ये सध्या कोविड सक्रिय रूग्णसंख्या 15,873 आहे.

गेल्या 24 तासात 2,593   नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.75 %

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  सध्या 0.54 %

Posted On: 24 APR 2022 11:23AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसारभारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्‍ये  आतापर्यंत देण्‍यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने   187  कोटी 67  लाख (1,87,67,20,318 ) मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशभरामध्‍ये 2,30,29,745 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्‍यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2 कोटी 65लाखांपेक्षा  अधिक (2,65,75,579) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत 18 ते 59 वयोगटातल्या 3,87,719 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आली आहे. 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404725

2nd Dose

10012053

Precaution Dose

4694892

FLWs

1st Dose

18414942

2nd Dose

17532038

Precaution Dose

7340412

Age Group 12-14 years

1st Dose

26575579

2nd Dose

2932476

Age Group 15-18 years

1st Dose

58140660

2nd Dose

41345317

Age Group 18-44 years

1st Dose

555482878

2nd Dose

475434938

Precaution Dose

84549

Age Group 45-59 years

1st Dose

202883319

2nd Dose

187363960

Precaution Dose

303170

Over 60 years

1st Dose

126838741

2nd Dose

116719403

Precaution Dose

14216266

Precaution Dose

2,66,39,289

Total

1,87,67,20,318

 

भारतामध्‍ये सध्‍या 15,873 सक्रीय रूग्णसंख्‍या आहे. देशामधील एकूण सक्रिय रूग्णांपैकी हे प्रमाण 0.04 टक्के आहे.

गेल्या 24 तासांत भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.75 % इतका आहे. 1,755  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,25,19,479  झाली आहे.

गेल्या 24 तासात  2, 593  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांमध्‍ये कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,36,532  चाचण्‍या करण्यात आल्या. आत्तापर्यंत भारतामध्‍ये एकूण  83.47  कोटींपेक्षा जास्त (83,47,17,702) चाचण्‍या करण्‍यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.54% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर  0.59 %  इतका नोंदला गेला आहे.

***

Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819485) Visitor Counter : 156