कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध स्रोतांच्या ठिकाणी 72.50 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध: श्री प्रल्हाद जोशी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत 22.01 दशलक्ष टन उपलब्ध


2021-22 मध्ये, 8.55%ची वृध्दी नोंदवत भारतामध्ये 777.23 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन

Posted On: 23 APR 2022 5:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री श्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सध्या कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), सिंगरेनी कोलरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल), कोळसा वॉशरीज अशा विविध स्त्रोतांमध्ये 72.50 दशलक्ष टन (एमटी) कोळसा उपलब्ध आहे. आपल्या ट्विटर संदेशात केंद्रीय मंत्री म्हणाले, की औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये (टीपीपी) 22.01 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध आहे.

देशात पुरेशी कोळशाची उपलब्धता असल्याचे सांगून श्री जोशी म्हणाले की, हा कोळसा महिनाभर टिकू शकेल आणि विक्रमी उत्पादन करत मागणीची पूर्तता केली जात आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे, की कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात कोळशाचे एकूण उत्पादन 8.55 टक्क्यांची वाढ नोंदवत,777.23 दशलक्ष टन (MT) वर पोहोचले आहे, जे 2020-21 मधे 716 मेट्रिक टन होते.   कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 2021-22 या आर्थिक वर्षात 4.43 टक्क्यांनी वाढून 622.64 मेट्रिक टन झाले आहे,जे 2020-21 मधे 596.24 मेट्रिक टन इतके होते.

सिंगरेनी कॉलरीज कंपनी लिमिटेड (SCCL) ने 28.55 टक्के वाढीसह 65.02 मेट्रिक टन उत्पादन काढले,2021-22 या मागील वर्षीच्या तुलनेत 50.58 MT इतके  होते.त्याच वेळी, बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादन 89.57 मेट्रिक टन आहे,जे 2020-21 मध्ये ते फक्त 69.18 MT इतके होते.

2021-22 मध्ये एकूण 818.04 मेट्रिक टन इतका कोळसा विविध ठिकाणी पाठवण्यात आला.  जो मागील वर्षीच्या 690.71 मेट्रिक टन होता, ज्यात 18.43 टक्क्यांची वाढ झाली आहे.  या कालावधीत, सीआयएलने 2020-21 मधील 573.80 मेट्रिक टनच्या तुलनेत 661.85 मेट्रिक टन कोळसा पाठवला.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819323) Visitor Counter : 173