अर्थ मंत्रालय

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची वॉशिंग्टन डी.सी.येथे वित्तीय कृती कार्यदलाच्या मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थिती

Posted On: 22 APR 2022 9:46AM by PIB Mumbai

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन , 21 एप्रिल 2022 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे वित्तीय कृती कार्यदलाच्या  मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थित  . जागतिक बँक समूह आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आयएमएफ ) 2022 च्या वसंतकालीन बैठकांसोबतच ही बैठक आयोजित करण्यात आली होती

या बैठकीत 2022-24 या वर्षांसाठी वित्तीय कृती कार्यदलाच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांना मान्यता देऊन मंत्र्यांनी धोरणात्मक दिशा देण्यावर लक्ष केंद्रित केले . वित्तीय कृती कार्यदलाच्या  जागतिक नेटवर्कला बळकट करणाऱ्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांच्या वितरणासाठी योग्य निधी  सुनिश्चित करणे, परस्पर मूल्यांकनाची वित्तीय कृती कार्यदल प्रणाली, आंतरराष्ट्रीय लाभदायक मालकी हक्काची पारदर्शकता वाढवणे,अपराध्याची  मालमत्तेची  अधिक प्रभावीपणे वसुल करण्यासाठी क्षमता वाढवणे,डिजिटल परिवर्तनाचा  लाभ  घेत, वित्तीय कृती कार्यदलाच्या धोरणात्मक प्राधान्यांसाठी शाश्वत निधी सुनिश्चित करणे,यासाठीच्या  मंत्र्याच्या  वचनबद्धतेला बळकटी देण्यात आली.


या बैठकीदरम्यान, वित्तमंत्र्यांनी मनी लाँडरिंग, दहशतवाद्यांना होणारा  वित्तपुरवठा आणि दहशतवादाच्या प्रसारासाठी होणारा  वित्तपुरवठा या विरोधात लढण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा  पुनरुच्चार केला.लाभदायक  मालकी हक्क  पारदर्शकता, मालमत्ता वसुली  आणि जागतिक वित्तीय प्रणालीचे रक्षण करण्यासाठी  वित्तीय कृती कार्यदलाच्या  जागतिक नेटवर्कची भूमिका  यासंदर्भातील  वित्तीय कृती कार्यदलाचे कार्य जाणून घेत  वित्तमंत्र्यांनी त्याची प्रशंसा केली.

 सीतारामन यांनी धोरणात्मक प्राधान्यक्रमांना पाठिंबा दर्शविला आणि त्या म्हणाल्या की,  मनी लाँड्रिंग, दहशतवाद्यांना होणारा  वित्तपुरवठा आणि मोठ्या प्रमाणावर  सामूहिक संहारक शस्त्रांच्या प्रसारासाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या विरोधात  एक जागतिक आघाडीच्या स्वरूपात  वित्तीय कृती कार्यदला करत असलेल्या प्रयत्नांना आवश्यक संसाधने आणि पाठबळ प्रदान करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

***


Jaydevi PS/SCCY


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818932) Visitor Counter : 373