जलशक्ती मंत्रालय
गंगा क्वेस्ट 2022 या ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी
Posted On:
21 APR 2022 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022
‘नमामि गंगे’ कार्यक्रमाला लोकचळवळीमध्ये परिवर्तीत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने ट्री क्रेझ फाउंडेशनसह 2019 मध्ये ऑनलाईन प्रश्नमंजुषेची सुरुवात केली. या वर्षी 7 एप्रिल 2022 रोजी गंगा क्वेस्ट 2022 स्पर्धेची सुरुवात झाली आणि आतापर्यंत या ऑनलाईन प्रश्नमंजुषेमध्ये एक लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा यावर्षीच्या जागतिक जैवविविधता दिनापर्यंत म्हणजे 22 मेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2022 रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या वेळी करण्यात येईल. गंगा क्वेस्ट स्पर्धेत भाग घेण्यासाठी कृपया www.clap4ganga.com या संकेतस्थळाला भेट द्या.

या स्पर्धेसाठीची नोंदणी 22 मार्च 2022 या जागतिक जल दिनापासून सुरु करण्यात आली. ही स्पर्धा पुढील चार संकल्पनांवर आधारित आहे:अर्थ गंगा आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, भौतिक भूगोल आणि प्रसिध्द स्थळे व व्यक्तिमत्त्वे, विद्यमान परिस्थितीतील घडामोडी आणि प्रशासन, वनस्पतीविश्व आणि प्रदूषण/ जल प्रक्रिया तंत्रज्ञान. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्याला लॅपटॉप तर द्वितीय तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्याला टॅबलेट अथवा किंडल देण्यात येणार आहे.
देशातील 10 वर्षांपेषा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल अशाच प्रकारे या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे तीन गट केले आहेत : पहिली श्रेणी – इयत्ता आठवीपर्यंतचे विद्यार्थी, दुसरी श्रेणी – इयत्ता नववी-दहावी, आणि तिसरी श्रेणी- प्रौढ नागरिक, विद्यापीठे, संस्था यांच्यात शिकणारे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक.
S.Kane/S.Chjtnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818711)
Visitor Counter : 293