ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

वर्ष 2022-23च्या रबी विपणन हंगामात, देशाच्या 9 राज्यांकडून (17 एप्रिल 2022 पर्यंत) 69.24 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला


नुकत्याच सुरु झालेल्या रबी विपणन हंगामामध्ये सुरु झालेल्या गहू खरेदीतून आतापर्यंत 5.86 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्यापोटी 13951.41 कोटी रुपये अदा करण्यात आले

Posted On: 18 APR 2022 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

देशातील मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 9 राज्यांमध्ये रबी विपणन हंगामातील गहू खरेदीला नुकतीच सुरुवात झाली. या राज्यांतील 5.86 लाख शेतकऱ्यांकडून 17 एप्रिल 2022 पर्यत 69.24 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आली असून त्याचे किमान आधारभूत मूल्य म्हणून त्यांना 13951.41 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांकडून  किमान  आधारभूत मूल्याने वर्ष 2021-22 च्या खरीप विपणन हंगामातील  तांदूळ खरेदी सुरळीतपणे सुरु आहे.

देशातील तांदूळ विक्रेत्या राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून 2021-22 च्या खरीप विपणन हंगामात 17 एप्रिल 2022 पर्यंत 754.08 लाख मेट्रिक टन (खरीप हंगामात 750.95 लाख मेट्रिक टन तर रबी हंगामात 3.14 लाख मेट्रिक टन यांच्यासह) तांदूळ खरेदी करण्यात आला आहे.

आतापर्यंत, 108.90 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्यापोटी 1,47,800.28 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

State/UT

Quantity of wheat Procurement (MTs)

No of farmers benefitted

MSP value (Rs. In Crore)

पंजाब/PUNJAB

3216668

256070

6481.59

हरियाणा/HARYANA

2776496

215151

5594.64

कुल उत्तर प्रदेश Total U.P. 

29794

5783

60.04

मध्य प्रदेश/M.P.

898679

108260

1810.84

राजस्थान/RAJASTHAN

544

46

1.10

उत्तराखंड/UTTRAKHAND

370

59

0.75

चंडीगढ़/CHANDIGARH

1085

180

2.19

गुजरात/GUJARAT

6

3

0.01

हिमाचलप्रदेश/HIMACHAL PR.

133

38

0.27

कुल योग/ALL INDIA TOTAL

6923775.8

585590

13951.41

 

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817822) Visitor Counter : 158