आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“आयुष्मान भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांनी गाठला आणखी एक महत्वाचा टप्पा – एकाच दिवशी सर्वाधिक वैद्यकीय टेली- सल्ले  देण्याचा विक्रम!”

Posted On: 17 APR 2022 9:51PM by PIB Mumbai

 

16 एप्रिल 2022 रोजी आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या   (एबी -एच डब्ल्यूसी ) माध्यमातून  एका दिवसात 3 लाखांहून अधिक वैद्यकीय टेली- सल्ले देण्यात आले. आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्रांद्वारे   एका दिवसात दिलेल्या  वैद्यकीय टेली- सल्ल्यांची ही सर्वाधिक  संख्या असून या आधीच्या प्रति दिवस 1.8  वैद्यकीय टेली- सल्ल्यांचा विक्रम मोडीत निघाला आहे. माननीय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एबी -एच डब्ल्यूसी 4 था वर्धापन दिन साजरा करत असलेल्या  दिवशी हे साध्य झाले.

एकाच दिवशी झालेली ही विक्रमी कामगिरी  ई-संजीवनी मंचाच्या  मजबूत तंत्रज्ञानाचा दाखला आहे.सुमारे 1 लाख आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्र आधीच सल्लागार म्हणून नोंदणीकृत आहेत आणि 25000 हून अधिक महत्वाची केंद्र वैद्यकीय टेली- सल्ला  प्रदान करतात,ई-संजीवनी पोर्टल संपूर्ण देशभरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे सुकर करते.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817629) Visitor Counter : 239