आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 186.30 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.38 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,191

गेल्या 24 तासात 949 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.25%

Posted On: 15 APR 2022 11:37AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.30 (1,86,30,62,546)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,26,50,313 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.38 (2,38,56,478) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 86,341 जणांना प्रीकॉशन मात्रा देण्‍यात आली.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,04,295

2nd Dose

1,00,07,566

Precaution Dose

45,80,505

FLWs

1st Dose

1,84,14,226

2nd Dose

1,75,24,822

Precaution Dose

71,01,355

Age Group 12-14 years

1st Dose

2,38,56,478

2nd Dose

42,352

Age Group 15-18 years

1st Dose

5,78,26,573

2nd Dose

4,02,12,393

Age Group 18-44 years

1st Dose

55,52,01,655

2nd Dose

47,19,88,872

Precaution Dose

18,691

Age Group 45-59 years

1st Dose

20,28,42,899

2nd Dose

18,66,45,135

Precaution Dose

67,650

Over 60 years

1st Dose

12,68,08,084

2nd Dose

11,62,62,445

Precaution Dose

1,32,56,550

Precaution Dose

2,50,24,751

Total

1,86,30,62,546

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,191 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.गेल्या 24 तासांत 810 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,07,038 झाली आहे.

गेल्या 24 तासात 949 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,67,213  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.11 (83,11,77,370)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.25% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.26% आहे.

 

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816994) Visitor Counter : 245