युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ई-खेल पाठशालाच्या समारोप सत्राचे उद्‌घाटन केले


शारीरिक शिक्षण हा विषय थेट आरोग्य आणि निरामयतेशी संबंधित गंभीर समस्यांचे निवारण करतो : अनुराग ठाकूर

Posted On: 13 APR 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत SAI LNCPE( भारतीय क्रीडा प्राधिकरण-,लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ) तिरुअनंतपुरम द्वारा आयोजित ई-खेल पाठशालाच्या समारोप  सत्राचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने घोषित केलेल्या फिट योजना सारख्या  महत्त्वाच्या योजना आणि सुविधा अधोरेखित केल्या, ज्या लोक चळवळ बनल्या आहेत  आणि खेळाडूंच्या मैदानातून  पोडियमपर्यंतच्या प्रवासात खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहेत. ते पुढे म्हणाले की संपूर्ण देशात खेळ अधिक लोकप्रिय व्हावेत यासाठी केंद्र  सरकारला  प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित करायचे आहे.  त्यांनी पंतप्रधानांचे शब्द उद्धृत केले - जेव्हा आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकतात आणि जेव्हा आपला तिरंगा उंच फडकतो तेव्हा त्या क्षणी एक अत्यंत खास अशी भावना असते आणि त्यामुळे संपूर्ण देशाला ऊर्जा मिळते. त्यांनी सूचित केले की शारीरिक शिक्षण हा एक विषय आहे जो थेट आरोग्य आणि निरामयतेच्या  गंभीर समस्याचे निराकरण करतो.  देशातील तरुणांनी खेळ हा जीवनाचा मार्ग म्हणून स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भौगोलिक मर्यादांची पर्वा न करता देशाच्या सर्व भागांमध्ये क्रीडा-संबंधित ज्ञान सहज उपलब्ध करून देणे हे ई-खेल पाठशालेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये राष्ट्रीय क्रीडा महासंघ, प्रख्यात प्रशिक्षक, खेळाडू आणि तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून विकसित केलेला व्यावसायिकदृष्टया संरचित अभ्यासक्रम आहे. हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालय, खेलो इंडिया आणि फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. ई-खेल पाठशाला हा भारतीय क्रीडा प्राधिकरणाने क्रीडा संबंधित ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तळागाळातील शारीरिक शिक्षण शिक्षक आणि समुदाय प्रशिक्षक/विद्यार्थ्यांना एकसमान संरचित ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रदान करण्याची  संकल्पना असलेला प्रकल्प आहे.

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816507) Visitor Counter : 188