आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 185.90 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.27 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 10,889

गेल्या 24 तासात 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.24%

Posted On: 12 APR 2022 9:30AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 185.90 (1,85,90,68,616)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,25,28,350 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.27 (2,27,48,406) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 27,401 जणांना प्रीकॉशन मात्रा देण्‍यात आली.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404154

2nd Dose

10005982

Precaution Dose

4550378

FLWs

1st Dose

18413999

2nd Dose

17521993

Precaution Dose

7039110

Age Group 12-14 years

1st Dose

22748406

Age Group 15-18 years

1st Dose

57701433

2nd Dose

39772921

Age Group 18-44 years

1st Dose

555097082

2nd Dose

470729023

Precaution Dose

6190

Age Group 45-59 years

1st Dose

202827997

2nd Dose

186387051

Precaution Dose

21211

Over 60 years

1st Dose

126796922

2nd Dose

116098640

Precaution Dose

12946124

Precaution Dose

2,45,63,013

Total

1,85,90,68,616

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 10,889 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 946 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,04,329 झाली आहे.

गेल्या 24 तासात 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,06,251  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.45 (79,45,25,202)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.24% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.20% आहे.

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815929) Visitor Counter : 249