वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने  चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची  सारणी  तयार केली


पीएम  गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, वेगवान लॉजिस्टिक सुनिश्चित सुविधा सुनिश्चित करण्यासाठी अपेडाचे  ( APEDA)  विविध मंत्रालयांबरोबर सहकार्य

Posted On: 09 APR 2022 4:11PM by PIB Mumbai

 

मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरचा तुटवडा यांसारख्या कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या लॉजिस्टिक आव्हानांना न जुमानता, भारताच्या कृषी निर्यातीने 2021-22 या वर्षात  50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला  आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने  (APEDA),   USD 25.6 अब्ज डॉलर्सच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात करून एक नवा इतिहास रचला आहे, जो भारताच्या एकूण USD 50 अब्ज कृषी निर्यातीच्या 51 टक्के आहे.

याशिवाय, अपेडाने  25.6 अब्ज डॉलर्सची  शिपमेंटची  नोंदणी करून आर्थिक वर्ष 2021-22 साठी 23.7 अब्ज डॉलर्सचे आपले निर्यात लक्ष्य देखील पार केलं  आहे.

वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (DGCI&S )  जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये कृषी निर्यात 19.92 टक्क्यांनी वाढून 50.21  अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाढीचा दर उल्लेखनीय असून  तो 2020-21 मध्ये गाठलेल्या 41.87 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 17.66 टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरची कमतरता सारखी  अभूतपूर्व लॉजिस्टिक आव्हाने असतानाही साध्य केला  आहे. अपेडा  शेड्यूल उत्पादनांची निर्यात खाली आलेख -1 मध्ये दिली आहे .

Graph-1

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001LAOL.jpg

गेल्या दोन वर्षांतील ऐतिहासिक कामगिरी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात  खूप उपयुक्त ठरेल.

एकूण कृषी निर्यातीच्या तुलनेत, अपेडाची  निर्यात 2020-21 मधील  22.03 अब्ज डॉलर्सवरून 16 टक्के वाढीसह  2021-22 मध्ये 25.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 2021-22 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अपेडा  उत्पादनांनी नोंदवलेला सर्वोच्च वाढीचा दर  (30 टक्क्यांहून अधिक) आलेख -2 वरून दिसून येईल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002V89M.jpg

2021-22 च्या आकडेवारीनुसार अपेडा  ज्या देशांना प्रामुख्याने  निर्यात करते ते देश आहेत- बांग्लादेश, युएई , व्हिएतनाम, अमेरिका , नेपाळ, मलेशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराण आणि इजिप्त.

कृषी-निर्यातीत लक्षणीय वाढ ही  कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य  उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यावर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा  म्हणून पाहिले जाते.

विविध देशांमध्ये B2B प्रदर्शने आयोजित करणे, भारतीय दूतावासांच्या सक्रिय सहभागाने उत्पादन विशिष्ट आणि सामान्य विपणन मोहिमेद्वारे नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेणे यासारख्या अपेडाच्या  मार्फत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने 300 हून अधिक लोकसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले.

अपेडाचे  अध्यक्ष डॉ एम अंगमुथू म्हणाले, आम्ही 50 कृषी उत्पादनांसाठी उत्पादने सारिणी  देखील तयार केली आहे ज्यात  आमच्या निर्यात पोर्टफोलिओच्या  विस्ताराला चांगला वाव आहे .

निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा  विविध आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषणात्मक माहिती, बाजारपेठेतील संधीची  माहिती   संकलित करते आणि  निर्यातदारांमध्ये प्रसारित करते  आणि व्यापार संबंधी शंकांचे निरसन करते.

पीएम  गति शक्ती - राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, अपेडा  नाशवंत कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंत्रालयासह  विविध मंत्रालयांशी सहकार्य  करत आहे,

शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), सहकारी संस्था आणि महिला उद्योजकांना निर्यातदारांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अपेडाच्या संकेतस्थळावर  फार्मर कनेक्ट पोर्टल देखील स्थापन  करण्यात आले आहे. पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 3,295 एफपीओ  आणि एफपीसी  आणि 3,315 निर्यातदारांची नोंदणी झाली आहे. अपेडा बरोबर 24  लाखांहून अधिक सेंद्रिय शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारत हा जगात सेंद्रिय उत्पादनांचा आघाडीचा उत्पादक आहे.

तक्ता: कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांची  निर्यात तुलना

 

Products

2021-22

USD million

2020-21

USD million

Rice

9654

8829

Dairy Products

634

323

Pulses

358

265

Other Cereals

1083

705

Cashew

452

420

Wheat

2118

567

Fruits & Vegetables

1789

1617

Processed Products

1202

1120

Floriculture products

103

77

 

Sheep/goat meat

60

34

 

Buffalo meat

3303

3171

 

Poultry

71

58

 

Miscellaneous processed items

4753

4844

 

Total

25580

22030

 

स्रोत: DGCIS, मार्च 2022 च्या ट्रेड अलर्टवर आधारित आणि बदलाच्या अधीन आहे

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1815201) Visitor Counter : 268