पंतप्रधान कार्यालय
देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पावले उचलत आहे: पंतप्रधान
पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत.
प्रविष्टि तिथि:
08 APR 2022 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की देशातल्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पावले उचलत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत. या सर्व घरांमध्ये मुलभूत सोयी पुरविण्यात आल्या आहेत आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या संदर्भात पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे,
“देशाच्या प्रत्येक गरिबाला पक्कं घर देण्याच्या संकल्पात आपण एका महत्वपूर्ण टप्प्यावर आलो आहोत. सर्वसामान्य जनतेच्या सहभागातूनच तीन कोटींपेक्षा जास्त घरांचे बांधकाम शक्य झाले आहे. मुलभूत सोयी असलेली ही घरे आज महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनली आहेत.”
***
RA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1814721)
आगंतुक पटल : 264
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam