आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 185.04 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 1.98 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 11,871

गेल्या 24 तासात 1,086 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.22%

Posted On: 06 APR 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 185.04 हून अधिक (1,85,04,11,569) मात्रांचा टप्पा पार केला. 2,22,69,994 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 1.98 कोटींहून अधिक (1,98,31,257) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होण्याचा कल कायम आहे,  उपचाराधीन रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ही रुग्णसंख्या 11,871 आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.03% इतके  आहे.

परिणामी, भारताचा कोरोनामुक्तीचा  दर 98.76%.इतका आहे.   गेल्या 24 तासांत 1,198 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,24,97,567.इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,086 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली

गेल्या 24 तासात एकूण 4,81,374  कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.20 कोटी  (79,20,27,142) चाचण्या केल्या आहेत

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी  दरांमध्येही सातत्याने घसरण होत  आहे. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  0.22% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील  0.23%. नोंदविण्यात आला आहे.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813984) Visitor Counter : 182