गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चक्रीवादळ/पूरग्रस्त राज्यांना आर्थिक सहाय्य


महाराष्ट्राला पुराच्या संकटाच्या काळात एनडीआरएफ मधून 1,056.39 कोटींचे आर्थिक सहाय्य जारी करण्यात आले

Posted On: 05 APR 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022

 

प्रत्यक्ष  पातळीवर बाधित लोकांना मदत पुरवण्यासह  आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी ही संबंधित राज्य सरकारांची आहे. राज्य सरकार चक्रीवादळ आणि पूर सारख्या  नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र  सरकारच्या मंजूर बाबी आणि नियमांनुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून मदत पुरवण्यासंबंधित  उपाययोजना करतात. ‘गंभीर स्वरूपाच्या’ आपत्तीच्या वेळी  निर्धारित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून  अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचे  मूल्यांकन आंतर-मंत्रालयीन  केंद्रीय पथकाच्या  (IMCT) भेटीच्या आधारे केले जाते.

2021-22 या आर्थिक वर्षात (31.03.2022 पर्यंत) संबंधित राज्याच्या एसडीआरएफच्या प्रारंभिक  शिल्लक रकमेच्या 50 टक्के समायोजनानंतर 1 एप्रिल, 2021 रोजी पूर आणि चक्रीवादळांसाठी एनडीआरएफ  कडून जारी निधीचे राज्यनिहाय  तपशील खालीलप्रमाणे  आहे:-

(Rs. in crore)

Sl.No.

Name of State

Name of Calamity

Assistance released from NDRF

1.

Andhra Pradesh

Floods

351.43

2.

Bihar

Floods

1,038.96

3.

Gujarat

Cyclone ‘Tauktae’

1,000.00*

4.

Jharkhand

Cyclone ‘Yaas’

200.00*

5.

Karnataka

Floods

1,623.30

6.

Madhya Pradesh

Floods

600.50

7.

Maharashtra

Floods

1,056.39

8.

Odisha

Cyclone ‘Yaas’

500.00*

9.

Sikkim

Floods/Landslides

55.23

10.

Tamil Nadu

Floods

566.36

11.

West Bengal

Cyclone ‘Yaas’

300.00*

Floods

50.13

 * एनडीआरएफ कडून आगाऊ रक्कम जारी

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1813899) Visitor Counter : 1006