आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 184.87 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 1.92 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 12,054

गेल्या 24 तासात 795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.22%

Posted On: 05 APR 2022 9:30AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.87 (1,84,87,33,081)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,22,15,213 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  1.92  (1,92,18,099) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403859

2nd Dose

10002280

Precaution Dose

4490941

FLWs

1st Dose

18413507

2nd Dose

17514855

Precaution Dose

6929201

Age Group 12-14 years

1st Dose

19218099

Age Group 15-18 years

1st Dose

57386396

2nd Dose

38713882

Age Group 18-44 years

1st Dose

554807914

2nd Dose

467684002

Age Group 45-59 years

1st Dose

202783194

2nd Dose

185736716

Over 60 years

1st Dose

126763579

2nd Dose

115689417

Precaution Dose

12195239

Precaution Dose

2,36,15,381

Total

1,84,87,33,081

 

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 12,054 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 1,280 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,96,369 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 4,66,332  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.15 (79,15,46,038)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.22% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.17% आहे.

***

SK/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813552) Visitor Counter : 201