शिक्षण मंत्रालय

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात नायकांच्या कहाण्या राष्ट्रीय स्मृतीकोशाचा भाग व्हाव्यात – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान


शिक्षणमंत्रालयातर्फे 1757 ते 1947 या कालावधीतील भारताचा स्वातंत्र्यलढा यावरील प्रदर्शनाचे आयोजन

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 04 APR 2022 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय इतिहास संशोधन परिषदेने संसद ग्रंथालयात भरवलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावरील प्रदर्शनाचे आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र  प्रधान यांनी या  प्रदर्शनाला भेट दिली. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच लोकसभेचे व राज्यसभेचे सदस्य या वेळी उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001S3GS.jpg

हे प्रदर्शन म्हणजे भारताच्या इतिहासातील 1757 ते  1947 या सुमारे   दोनशे वर्षांच्या कालखंडाची झलक आहे, असे प्रधान यांनी यावेळी सांगितले. अज्ञात नायकांच्या  स्मृती राष्ट्रीय स्मृतीत  कोरल्या जाव्यात हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचेही प्रधान यानी नमूद केले. देशाच्या विविध भागातील खासदारांनी प्रदर्शनाला भेट देऊन आपापल्या भागातील असे अज्ञात नायक सुचवावेत असेही त्यांनी सांगीतले.

सांस्कृतिक मंत्रालयातर्फे विविध राज्यांच्या समन्वयाने हे प्रदर्शन देशात 100 ठिकाणी भरवण्यात येईल तसेच डिजिटल मंचावरही आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


* * *

S.Kakade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813208) Visitor Counter : 173