नागरी उड्डाण मंत्रालय

चेहेऱ्यावरून व्यक्ती ओळखणारी यंत्रणा (FRS) टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे


कोलकाता, वाराणसी, पुणे, विजयवाडा, बेंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद या शहरात एफआरएस ही यंत्रणा मार्च 2023 कार्यान्वित होणार

Posted On: 04 APR 2022 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

चेहेऱ्यावरून व्यक्ती ओळखणारी  यंत्रणा (FRS) हा सरकारच्या डिजी यात्रा या उपक्रमाचा एक भाग आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना विमानतळांवर कुठलेही अडथळे, अडचणींना तोंड द्यावे लागत नाही.   या प्रणालीची  अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.  पहिला टप्पा मार्च 2023 पर्यंत कोलकाता, वाराणसी, पुणे, विजयवाडा, बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांमधील विमानतळांवर कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. या विमानतळांवर  डिजी यात्रा बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टमची प्राथमिक चाचणी, प्रवास करावयाच्या दिवसाची  नोंदणी करण्यासह  पूर्ण झाली  आहे.

या  सुरक्षेची आवश्यकता गतिमान स्वरूपाची आहे. देशातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण असलेला नागरी हवाई सुरक्षा विभाग  (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ,BCAS)  इतर संबंधित संस्था  आणि भागधारकांशी सल्लामसलत करून, विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतो  आणि आवश्यकतेनुसार ती यंत्रणा अद्ययावत करत असतो .

नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील  राज्यमंत्री जनरल (निवृत्त)डॉ.  व्ही.के. सिंग  यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813199) Visitor Counter : 249