गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान शहरी आवास योजनेबाबतच्या केंद्रीय मंजुरी आणि परीक्षण समितीची 60 वी बैठक संपन्न
Posted On:
31 MAR 2022 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 31 मार्च 2022
केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीएसएमसी अर्थात केंद्रीय मंजुरी आणि परीक्षण समितीच्या 60व्या बैठकीमध्ये सहा राज्यांनी सादर केलेल्या पीएमएवाय-यू अर्थात पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत वाढीव 2 लाख 42 हजार घरांच्या उभारणीच्या प्रकल्प प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ही घरे पीएमएवाय-यू योजनेतील ‘लाभार्थी आधारित घर बांधणी’, ‘भागीदारीतून किफायतशीर गृहनिर्माण’ आणि ‘आहे त्याच जागी झोपडपट्टी पुनर्वसन’ या घटकांच्या अंतर्गत उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या बैठकीत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात,त्रिपुरा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांचे घर बांधणी प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
बैठकीच्या सुरुवातीला,केंद्रीय गृह निर्माण सचिवांनी या राज्यांमध्ये घरांच्या उभारणीच्या कार्यात येणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी बांधून पूर्ण होत असलेली घरे आणि घरांचे वितरण संबंधी प्रगतीचा देखील आढावा घेतला. पीएमएवाय-यू अभियानाच्या संदर्भात प्रकल्पांची तपासणी तसेच सहभागी राज्यांची कामगिरी याचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला.
पीएमएवाय-यू योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांचे बांधकाम आता विविध टप्प्यांवर आहे. या अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या एकूण घरांची संख्या आता 117 लाख 9० हजार झाली आहे; त्यापैकी सुमारे 95 लाख 20 हजार घरांचे बांधकाम सुरु झाले असून सुमारे 56 लाख 30 हजार घरांची उभारणी पूर्ण होऊन लाभार्थ्यांना त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी 7.70 लाख कोटी रुपये खर्च येणार असून केंद्र सरकार या अभियानासाठी 1.96 लाख कोटी रुपयांचे साहाय्य देणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेसाठी 1.18 लाख कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत.
देशात ‘प्रत्येकासाठी घर’ या संकल्पनेच्या धर्तीवर काम करण्यासाठी पीएमएवाय-यू योजनेंतर्गत घरांचे बांधकाम, कामाची पूर्तता आणि लाभार्थ्यांना घरांचे वितरण या कामांना वेग देण्यावर या बैठकीत नव्याने भर देण्यात आला.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1811871)
Visitor Counter : 306