अवजड उद्योग मंत्रालय
अर्धसंवाहक (सेमी कंडक्टर) चिप्सचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने उचलली अनेक पावले
Posted On:
29 MAR 2022 12:45PM by PIB Mumbai
अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) चिप्सचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे सूचित केले आहे. खालील प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
i) उच्च क्षमता फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक्ससाठी गॅलियम नायट्राइड परिसंस्था सक्षम केंद्र आणि इनक्यूबेटरची स्थापना.
ii) उत्पादन सलग्न प्रोत्साहन योजनेंतर्गत (पीएलआय) एनएएनडी फ्लॅश मेमरी संबंधित जोडणी, चाचणी, चिन्हांकित करणे आणि आवेष्टन (एटीएमपी) यासाठीचे प्रकल्प.
iii) ट्रांझिस्टर, डायोड इत्यादींसह वेगळ्या अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) उपकरणांसाठी प्रकल्प सलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
iv) इलेक्ट्रॉनिक घटक आणि अर्धसंवाहकाच्या (सेमीकंडक्टर्स, एसपीईसीएस) निर्मितीला बळ देण्यासाठी योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन.
अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810858)
Visitor Counter : 207