पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेतर्फे पाण्यातील खेळ आणि संबंधित उपक्रमांचे 27 अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत: जी. किशन रेड्डी

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2022

 

पाण्यातील खेळ  आणि संबंधित उपक्रमांचे  प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रासाठी, गोव्यातील राष्ट्रीय जलक्रीडा संस्था  (NIWS) हे पर्यटन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेअंतर्गत  (IITTM)  कार्यरत असलेले स्वायत्त  केंद्र आहे.  पाण्याशी संबंधित खेळांचे  प्रशिक्षण, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  देण्याची जबाबदारी गोव्याच्या एनआयडब्लूएसकडे देण्यात आली आहे. केंद्रीय स्वायत्त संस्थेचे कोणतेही केंद्र उघडण्यासाठी काही घटकांचा विचार केला जातो, जसे, पर्यटन विकासाची क्षमता, संसाधनांची उपलब्धता, व्यवहार्यता, मागणी व  असे इतर घटक, राज्य व  केंद्रशासित प्रदेशांमधील विविध स्थळांवर  तुलनात्मक फायदा. महाराष्ट्रात एनआयडब्ल्यूएस स्थापन करण्यासाठी मंत्रालयाला  कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला  नाही.

देशातील जलक्रीडा संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना साहाय्य करण्याकरिता मंत्रालय ठोस प्रयत्न करत आहे. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पाण्यातले खेळ,समुद्रकिनारे सुरक्षा असे महत्त्वाचे घटक असून बेट, समुद्रकिनारे आणि संबंधित विकासासाठी पर्यटन मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना अनुदान-साहाय्य पुरवते, . याशिवाय, भारतातील साहसी पर्यटन  चालकांच्या  मंजुरीसाठी मंत्रालयाअंतर्गत  एक यंत्रणा आहे.

राष्ट्रीय जलक्रीडा संस्था  (NIWS) गोवा मार्फत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे, प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार करण्यासाठी, मनुष्यबळ प्रशिक्षण इत्यादींशी संबंधित बाबींमध्ये सहाय्य प्रदान केले जाते. उपक्रमांना पाठबळ  देण्यासाठी संस्थेने राज्ये,केंद्रशासित प्रदेश आणि  भारतीय नौदल शारीरिक प्रशिक्षण संस्थेसोबत  सामंजस्य करार केला आहे.

पाण्यातील खेळ  आणि संबंधित उपक्रमांचे 27 हून अधिक अभ्यासक्रम राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेने  विकसित केले आहेत. संस्थेचे प्रशिक्षक विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  प्रशिक्षण देतात. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा  दोन्ही पद्धतींद्वारे संस्था पाण्यातील खेळांबाबत  जागरूकता मोहिमादेखील राबवते.

पर्यटन मंत्री  जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1810625) आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Telugu , Kannada