गृह मंत्रालय
राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार 2022 करणार प्रदान
Posted On:
28 MAR 2022 11:02AM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवन येथे आज दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद वर्ष 2022 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. आजच्या समारंभात सन्मानित करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये पद्मविभूषण पुरस्कार घोषित व्यक्ती- डॉ. प्रभा अत्रे, कल्याण सिंग (मरणोत्तर). पद्मभूषण पुस्कार घोषित व्यक्ती- व्हिक्टर बॅनर्जी, डॉ. संजय राजाराम (मरणोत्तर), डॉ. प्रतिभा रे आणि आचार्य वशिष्ठ त्रिपाठी तसेच डॉ. कृष्ण मूर्ती एला व सुचित्रा कृष्णा एला (जोडी). नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यातील पहिल्या टप्प्यात 21 मार्च रोजी पुरस्कारप्राप्त काही व्यक्तींना सन्मानित करण्यात आले होते.
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. 'पद्मविभूषण' अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय सेवेसाठी दिला जातो. विशिष्ट सेवेतील उल्लेखनीय कार्याकरिता ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार दिले जातात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी एकूण 128 पद्म पुरस्कार प्रदान केले जात आहेत. पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये चार पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यापैकी 34 महिला आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये परदेशी/अनिवासी भारतीय /भारतीय वंशाच्या व्यक्ती /ओसीआय या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810388)
Visitor Counter : 305