रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
"स्वयंचलित चाचणी केंद्रांची (एटीएस) मान्यता, नियमन आणि नियंत्रण" संबंधित नियमांमधील सुधारणांसाठी मसुदा अधिसूचना जारी
Posted On:
27 MAR 2022 3:14PM by PIB Mumbai
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 23 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या "स्वयंचलित चाचणी केंद्रांची(एटीएस) मान्यता, नियमन आणि नियंत्रण" संबंधित नियमांमध्ये काही सुधारणा करण्यासाठी, 25 मार्च, 2022 रोजी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे.
या केंद्रांच्या स्थापनेसाठी पात्रता निकष, उपकरणांपासून सर्व्हरपर्यंत चाचणी निकालांचे स्वयंचलित प्रसारण, एका राज्यात नोंदणीकृत वाहनांची दुसऱ्या राज्यात चाचणी आणि जुने म्हणजेच क्षमता संपलेले वाहन घोषित करण्याचे निकष या बाबींमधे हे मसुदा नियम सुधारणा सुचवतात. यात समाविष्ट दोन तक्त्यांमध्ये काही किरकोळ बदलही प्रस्तावित करण्यात आले आहेत जे घ्यायवयाच्या चाचण्यांची यादी आणि स्वयंचलित चाचणी केंद्रांमध्ये स्थापित केल्या जाणार्या उपकरणांची वैशिठ्ये सांगतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचणीसाठी काही नवीन उपकरणे देखील समाविष्ट आली आहेत. चाचणीच्या निकालांसाठी नवीन प्रमाणित स्वरूप जोडण्यात आले आहे. वाहनमालकांना सुविधा देण्याचा आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे
सर्व हितसंबंधीतांची मते आणि सूचनांसाठी ही अधिसूचना 30 दिवसांकरिता (24 एप्रिल 2022 पर्यंत) सार्वजनिक मंचावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
***
S.Kakade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810218)
अभ्यागत कक्ष : 199