आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आरोग्य मंत्रालयाची पथदर्शी टेलिमेडिसीन योजना- “ई-संजीवनी’ अंतर्गत आतापर्यंत 3 कोटी रुग्णांना टेलि-सल्ला


एका दिवसांत 1.7 लाख लोकांना सल्ले देत, ‘ई-संजीवनी’ टेलिमेडिसीन सुविधेने प्रस्थापित केला नवा विक्रम

देशभरातील आयुष्मान भारत-आरोग्य आणि निरामयता केंद्रांतून ई-संजीवनी सेवेचा 2,26,72,187 गरजूंना लाभ

Posted On: 25 MAR 2022 3:43PM by PIB Mumbai

 

भारताच्या ई-आरोग्य सुविधेच्या प्रवासात, आपण आता एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई- संजीवनी टेलिमेडिसीन या योजनेअंतर्गत, 3 कोटींपेक्षा अधिक टेलि-उपचार सल्ले देण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर एकाच दिवसांत, 1.7 लाख लोकांना उपचारविषयक सल्ले देत ई संजीवनीने आणखी एक विक्रम रचला आहे.

काही राज्यांत, ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे  तर काही राज्यांत ही सेवा 24 तास देखील सुरु आहे.

कोणत्याही देशाने पहिल्यांदाच  सुरू केलेली ही वेगळी सेवा, ई-संजीवनी या उपक्रमाचे दोन प्रकार आहेत :

1. ई-संजीवनी आयुष्मान भारत -आरोग्य आणि निरामयता केंद्रे (AB-HWC): आयुष्मान भारत अंतर्गत दिली जाणारी डॉक्टर ते डॉक्टर टेलिमेडिसीन सेवा. याद्वारे, ग्रामीण भाग किंवा दुर्गम भागात साधारण तसेच विशेष आरोग्यविषयक सेवा पुरवल्या जातात.

2. ई-संजीवनी बाह्य रुग्ण विभाग (ओपिडी) : ही रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील टेलिमेडिसीन सेवा आहे असून याद्वारे रुग्णांना घरबसल्या आपल्या आजारांवर उपचारासाठी डॉक्टरांकडून सल्ला घेता येतो.

या योजनेच्या 3 कोटी लाभार्थीपैकी, 2,26,72,187 लोकांनी ई-संजीवनी पोर्टलच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेतला आहे. तर इतरांना ई-संजीवनी ओपीडी च्या माध्यमातून लाभ मिळाला आहे. 1,00,000 पेक्षा अधिक डॉक्टर्स, विशेषज्ञ, राष्ट्रीय टेलिमेडिसीन सेवेच्या मंडळावर असून त्यांच्यामार्फत गरजूंना या सेवेचा लाभ घेता येतो आहे.

ई-संजीवनी-ओपीडी च्या माध्यमातून आता गरजूंना आपले आयुष्मान भारत आरोग्य खाते देखील उघडता येऊ शकेल. यामुळे, रुग्णाची आरोग्यविषयक माहिती एकाच जागी ऑनलाईन उपलब्ध होऊ शकेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून, आरोग्य सुविधांचा लाभ गरजूना मिळू शकेल, आणि रुग्णाच्या परवानगीने, त्याची आधीची आरोग्यविषयक माहिती डॉक्टर्स उपचारात संदर्भ म्हणून बघू शकतील.

आरोग्य मंत्रालयाची राष्ट्रीय टेलिमेडिसीन सेवा आणि देशातील टेलिमेडिसीन सेवेचा लवकरात लवकर अंगिकार होण्यात आलेले यश लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयानेही संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ई-हेल्थ टेलिमेडिसीन सल्ला आणि मदत सेवा पोर्टल- SeHATOPD सुरु केले आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि अलायन्स इंडिया ही संस्था- एचआयव्ही /एड्स च्या रुग्णांसाठी एक समर्पित टेलिमेडिसीन प्लॅटफॉर्म ई-एचआयव्ही केअर (eHIVCare) चालवते.

ई-संजीवनी योजना आपल्या राज्यात राबवण्यात आघाडीवर असलेली दहा राज्ये म्हणजे, आंध्रप्रदेश, (13147461), कर्नाटक (4424407), पश्चिम बंगाल(2987386), तामिळनाडू (1856861), उत्तर प्रदेश(1758053), बिहार (1002399), महाराष्ट्र(930725), मध्यप्रदेश (781262), गुजरात (753775) आणि आसाम (477821).

eSanjeevani Consultations

Sr No.

25.03.2022

TOTAL (HWC & OPD)

eSanjeevani AB-HWC

eSanjeevani OPD

 

 

INDIA

30049966

22672187

7377779

 

1

Andhra Pradesh

13147461

13118406

29055

 

2

Karnataka

4424407

2240571

2183836

 

3

West Bengal

2987386

2977774

9612

 

4

Tamil Nadu

1856861

152721

1704140

 

5

Uttar Pradesh

1758053

365248

1392805

 

6

Bihar

1002399

957226

45173

 

7

Maharashtra

930725

817800

112925

 

8

Madhya Pradesh

781262

775161

6101

 

9

Gujarat

753775

89229

664546

 

10

Assam

477821

450856

26965

 

11

Uttarakhand

473004

662

472342

 

12

Kerala

389860

3574

386286

 

13

Punjab

176837

172987

3850

 

14

Chhattisgarh

148242

147353

889

 

15

Himachal Pradesh

147546

142643

4903

 

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1809627) Visitor Counter : 917