नौवहन मंत्रालय
सागरमाला प्रकल्पाची स्थिती
Posted On:
25 MAR 2022 12:10PM by PIB Mumbai
सागरमाला कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, अंदाजे 5.48 लाख कोटी रुपये किमतीचे 800 हून अधिक प्रकल्प अंमलबजावणीसाठी निवडण्यात आले आहेत. सागरमाला प्रकल्पांमध्ये सध्याची बंदरे आणि टर्मिनल्सचे आधुनिकीकरण, नवीन बंदरे, टर्मिनल, रोरो आणि पर्यटन जेटी, बंदर जोडणी वाढवणे, अंतर्देशीय जलमार्ग, दीपगृह पर्यटन, बंदराभोवती औद्योगिकीकरण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान केंद्रे इत्यादी विविध श्रेणीतील प्रकल्पांचा समावेश आहे. सागरमाला कार्यक्रमात पाच आधारांवर हाती घेतलेल्या प्रकल्पांचा सारांश परिशिष्ट I मध्ये दिला आहे.
जवाहरलाल नेहरू बंदरातील विशेष आर्थिक क्षेत्र, दीनदयाल बंदर आणि पारादीप बंदर येथील स्मार्ट इंडस्ट्रियल पोर्ट सिटी आणि व्ही.ओ. चिदंबरनार बंदर परिसरात तटीय रोजगार केंद्र हे सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहेत.
अंदाजे 1,25,776 कोटी रु.च्या गुंतवणुकीसह नवीन बंदरांच्या विकासाशी संबंधित 14 प्रकल्प हे सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहेत. हे प्रकल्प आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि तामिळनाडूसह किनारपट्टीवरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत. प्रकल्पांची अंमलबजावणी राज्य सागरी मंडळे आणि प्रमुख बंदरे इत्यादींद्वारे केली जाणार आहे. गुजरातमध्ये, छारा येथील बल्क टर्मिनल/ ग्रीनफील्ड पोर्ट आणि भावनगर बंदरातील सीएनजी टर्मिनल यासह नवीन बंदरांच्या विकासाशी संबंधित 2 प्रकल्प सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहेत आणि गुजरात मेरीटाईम बोर्डामार्फत ते राबविण्यात येत आहेत.
परिशिष्ट I
Project Pillar/Theme
|
Total
|
Completed
|
Under Implementation
|
#
|
TPC
(Rs. Cr)
|
#
|
TPC
(Rs. Cr)
|
#
|
TPC
(Rs. Cr)
|
Port Modernization & New Port Development
|
237
|
250606
|
82
|
29575
|
56
|
37375
|
Port Connectivity Enhancement
|
213
|
138514
|
57
|
20958
|
71
|
84140
|
Port Led Industrialization
|
33
|
119845
|
9
|
45865
|
21
|
72705
|
Coastal Community Development
|
77
|
10135.7
|
18
|
1422.9
|
19
|
2351
|
Coastal Shipping & IWT
|
242
|
29382
|
28
|
1178
|
51
|
15953
|
Total
|
802
|
548484
|
194
|
99000
|
218
|
212526
|
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
Jadevi PS/VJ/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809563)
Visitor Counter : 346